31 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
घरराजकारणराज्याचा आरोग्यमंत्री इतका असंवेदनशील कसा असू शकतो?

राज्याचा आरोग्यमंत्री इतका असंवेदनशील कसा असू शकतो?

Google News Follow

Related

नाशिकच्या झाकीर हुसेन रुग्णालयात झालेल्या ऑक्सिजन गळतीच्या घटनेने राज्यच नाही तर सारा देश हादरून गेला आहे. देशाच्या पंतप्रधानांपर्यंत सगळ्यांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेतली आहे. तर या प्रकरणाची चौकशी करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांकडून सांगण्यात येत आहे. पण अशा परिस्थितीत राज्याच्या आरोग्य मंत्र्यांनी माध्यमांना दिलेली प्रतिक्रिया फारच धक्कादायक होती. त्यांच्या याच प्रतिक्रियेवरून भारतीय जनता पार्टीचे नेते आमदार अतुल भातखळकर यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यावर निशाणा साधला आहे. “राज्याचा आरोग्यमंत्री इतका असंवेदनशील कसा असू शकतो?” असे म्हणत भातखळकर यांनी राजेश टोपेंवर हल्ला चढवला आहे.

राज्यात एकीकडे ऑक्सिजनची कमतरता भासत असताना दुसरीकडे नाशिकमधील महापालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजनची गळती झाल्याची धक्कादायक दुर्घटना झाली आहे. या ऑक्सिजन गळतीमुळे व्हेन्टिलेटरवर असलेल्या २३ रुग्णांपैकी २२ जणांचा मृत्यू झाला. नाशिकच्या झाकीर हुसेन रुग्णालयात दुपारी १२:३० च्या सुमारास ऑक्सिजनची गळती झाल्याचा प्रकार घडला. रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळ ऑक्सिजन भरण्यासाठी टँकर आला होता. त्यावेळी ही गळती होत असल्याचे लक्षात आले. एकूण १५० रुग्ण या रुग्णालयात होते. आधीच महाराष्ट्रात ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा असताना आणि ऑक्सिजनसाठी बाहेरच्या राज्यांतून ऑक्सिजन एक्सप्रेसच्या माध्यमातून ऑक्सिजनचे टँकर आणले जात असताना नाशिकच्या झाकीर हुसेन हॉस्पिटलच्या प्रवेशद्वाराजवळ असलेल्या ऑक्सिजनच्या भल्यामोठ्या टाकीतून गळती झाली.

हे ही वाचा:

नाशिकमध्ये ऑक्सिजन गळतीचा भयंकर प्रकार; रुग्ण दगावल्याची भीती

नाशिकमध्ये ऑक्सिजन गळतीची भयंकर घटना, २२ रुग्णांचा तडफडून मृत्यू

सिरम इन्स्टिट्युटकडून लसींची किंमत जाहिर

नाशिक मनपा रुग्णालयातील ऑक्सिजन गळतीची राष्ट्रीय स्तरावर दखल

या ऑक्सिजन गळतीमुळे तब्बल २२ रुग्णांचे बळी गेले आहेत. मुख्यमंत्र्यांनीही या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. पण तरी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी या ऑक्सिजन गळतीला ‘किरकोळ’ गळती म्हणत आपल्या असंवेदनशीलतेचे प्रदर्शन केले. यावरूनच भाजपा नेते आमदार अतुल भातखळकर यांनी ट्विट करत आरोग्यमंत्र्यांची चांगलीच खरडपट्टी केली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
149,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा