29.9 C
Mumbai
Friday, March 29, 2024
घरक्राईमनामासंदीप देशपांडे, संतोष धुरी विरोधात गुन्हा दाखल

संदीप देशपांडे, संतोष धुरी विरोधात गुन्हा दाखल

Google News Follow

Related

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) नेते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांच्याविरोधात गुन्हा दखल करण्यात आला आहे. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. दोघांविरोधात भादंवि ३५३ अंतर्गत अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे मनसेच्या दोन्ही नेत्यांना अटक झाल्यास किमान २ वर्षांची कारावासाची शिक्षा आहे.

भोंगा प्रकरणानंतर राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी पोलिसांकडून मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची धरपकड सुरू होती. त्यावेळी राज ठाकरे यांच्या निवासस्थानाजवळून मनसे नेते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांनी पोलिसांना चकवा देऊन निसटले. या दरम्यान झटापट झाली आणि एक महिला पोलीस जखमी झाली.

हे ही वाचा:

राणा दाम्पत्याला अटी- शर्तींसह जामीन मंजूर

नितेश राणेंच्या निशाण्यावर पुन्हा रझा अकादमी, पीएफआय

राज्यात अनेक ठिकाणी भोंग्याविना अजान

राज ठाकरे यांना मुंबई पोलिसांकडून नोटीस

दरम्यान, संदीप देशपांडेंवर कारवाई होणार असल्याची चर्चा होती. आता गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांना कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. संदीप देशपांडे, संतोष धुरी आणि वाहन चालक यांच्या विरोधात सरकारी कामात अडथळा निर्माण करणे, निष्काळजीपणे वाहन चालवणे, निष्काळजीपणे वाहन चालवून दुखापतीस कारणीभूत अशा कारणांसाठी भादंवि ३५३, २७९, ३३६ अन्वये गुन्हा दखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर फरार झालेल्या संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांचा पोलीस शोध घेत आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
144,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा