25 C
Mumbai
Monday, September 16, 2024
घरअर्थजगतअर्थमंत्री सीतारामन गुरुवारी अर्थसंकल्प सादर करणार

अर्थमंत्री सीतारामन गुरुवारी अर्थसंकल्प सादर करणार

९ फेब्रुवारी रोजी अधिवेशन संपेल

Google News Follow

Related

संसदेचे अर्थसंकल्प अधिवेशन बुधवारपासून सुरू होत असून देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यावेळी हंगामी अधिवेशन सादर करणार आहेत. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील हा शेवटचा अर्थसंकल्प असून सीतारामन बुधवार, १ फेब्रुवारी रोजी हंगामी अर्थसंकल्प सादर करतील. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. तर, ९ फेब्रुवारीपर्यंत चालणाऱ्या या अधिवेशनात विरोधी पक्ष विविध मुद्द्यांवर सत्ताधारी पक्षाला जेरीस आणण्याची शक्यता आहे.

संसदेतील अर्थसंकल्पीय अधिवेशनाआधी सर्व पक्षांच्या नेत्यांची मंगळवारी सर्वपक्षीय बैठक झाली. बैठकीसाठी केंद्राकडून सर्व पक्षांना आमंत्रित करण्यात आले होते. केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दोन्ही सदनांच्या सर्व पक्षांच्या नेत्यांसोबत बैठक घेतली. अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या भाषणाने होईल. तर, ९ फेब्रुवारी रोजी अधिवेशन संपेल.

हे ही वाचा:

“लोकशाही मूल्यांचे वस्त्रहरण करणाऱ्या खासदारांनी शेवटच्या सत्रात आत्मपरिक्षण करावं”

क्रिकेटपटू मयांक अगरवाल विमानातच पडला आजारी!

छत्तीसगड: नक्षलवाद्यांचा सीआरपीएफ कॅम्पवर हल्ला, ३ जवान हुतात्मा १४ जखमी!

मंदिर पिकनिक स्पॉट नाही; ध्वजस्तंभाच्या आत हिंदू नसणाऱ्यांनी प्रवेश करु नये

हंगामी अर्थसंकल्प २०२४

भारतीय राज्यघटनेच्या कलम ११२ अंतर्गत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीआधी सरकारकडून संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला जातो. अर्थसंकल्प म्हणजे आर्थिक वर्षात होणाऱ्या सरकारच्या जमा आणि खर्चाशी संबंधित दस्तावेज असतो. हे आर्थिक वर्ष १ एप्रिल ते ३१ मार्चपर्यंत असते. या वर्षी लोकसभा निवडणुका असल्याने यावेळचा अर्थसंकल्प हंगामी असेल. सर्वसाधारण निवडणुकीनंतर निवडण्यात आलेले सरकार जुलैमध्ये आर्थिक वर्ष २०२४-२५साठी पूर्ण अर्थसंकल्प सादर करेल.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
177,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा