34 C
Mumbai
Friday, May 17, 2024
घरविशेषभारतीय मेंढपाळ चिनी सैनिकांना भिडले: दिला 'आवाज'

भारतीय मेंढपाळ चिनी सैनिकांना भिडले: दिला ‘आवाज’

चुशूल सेक्टरमध्ये भारतीय मेंढपाळ आणि चिनी सैनिकांमध्ये शाब्दिक चकमक

Google News Follow

Related

लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी लडाखमधील वास्तविक नियंत्रण रेषेवरील (एलएसी) परिस्थिती ‘स्थिर परंतु संवेदनशील’ म्हणून केल्यानंतर आठवडाभरातच एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे. चुशूल सेक्टरमध्ये भारतीय मेंढपाळ आणि चिनी पीपल्स लिबरेशन आर्मीच्या (पीएलए) सैनिकांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक उडाल्याचे या व्हिडीओत दिसत आहे. हा व्हिडीओ २ जानेवारी रोजीचा असल्याचे सांगितले जात आहे.

लडाख ऑटोनोमस हिल डेव्हलपमेंट कौन्सिल-लेह येथील विरोधी पक्षनेते आणि लेह शहराचे नगरसेवक सेरिंग नामग्याल यांनी हा साडेसहा मिनिटांचा व्हिडीओ जाहीर केला आहे. त्यात सहा ते आठ चिनी सैनिक त्यांच्या गाड्यांमधून आले असून ते ताकलुंग चोरोक खोऱ्यातून या मेंढपाळांना दरडावत असल्याचे दिसत आहे.

‘चिनी सैनिकांनी रोखल्यानंतर या मेंढपाळांनी धाडसाने तेथून जाण्यास नकार दिला आणि चिनी सैनिकांवर दगडफेक केली. मेंढपाळ आणि चिनी सैनिकांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक उडाली. त्यात मेंढपाळांनी हा भारताचा भूभाग असून त्यांनी येथून ताबडतोब काढता पाय घ्यावा, असे त्यांना बजावले,’ असे नामग्याल यांनी सांगितले.

मे २०२०मध्ये पूर्व लडाख भागात एलएसीजवळ तणाव झाल्यानंतरची ताजी घडामोड आहे. त्या घटनेनंतर भारत आणि चीनने गलवान खोरे, पेगॉंग त्सो, गोगरा आणि हॉट स्प्रिंग्स या भूभागावरून उद्भवणारे वाद शमवले असले तरी आताही या भागांत दोन्ही बाजूंनी हजारो सशस्त्र लष्कर तैनात आहेत. तर, देपसांग आणि देमचॉक भूभागावरून अजूनही चर्चा सुरू आहे.

चिनी सैनिकांनीही या मेंढपाळांचे चित्रिकरण केले आहे. ही घटना चुशुल सेक्टरमधील ताकलुंग भागात घडली. मेंढपाळांशी शाब्दिक चकमक उडाल्यानंतर चिनी सैनिकांनी या जागेतून काढता पाय घेतला, असे नामग्याल यांनी सांगितले. ‘हा वाद आणखी चिघळू नये, यासाठी त्याच दिवशी भारतीय लष्कर आणि चिनी लष्करांच्या प्रतिनिधींची एकमेकांशी भेट घेतली. ११ जानेवारी रोजी, उपविभागीय दांडाधिकारी न्याओमा ब्लॉक, जिग्मेट आंगचुक यांनीही परिस्थितीची पाहणी करण्यासाठी या जागेला भेट दिली,’ अशी माहिती नामग्याल यांनी दिली.

हे ही वाचा:

पाकिस्तानच्या बलुचिस्तानमध्ये बंडखोरांनी १५ नागरिकांना मारले!

तामिळनाडू सरकारने २२ जानेवारीला फक्त चार धार्मिक कार्यक्रमांना दिली परवानगी!

शिवसेना आमदार अनिल बाबर यांचे निधन

छत्तीसगड: नक्षलवाद्यांचा सीआरपीएफ कॅम्पवर हल्ला, ३ जवान हुतात्मा १४ जखमी!

तर, अशा घटना सर्वसामान्य असून दोन्ही बाजूंनी घडतात. बऱ्याचदा मेंढपाळ त्यांच्या मेंढ्यांना चरता चरता एकमेकांच्या सीमेपार भटकतात, तेव्हा अशा घटना घडतात, अशी माहिती एका सरकारी अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
153,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा