34 C
Mumbai
Tuesday, December 9, 2025
घरक्राईमनामाआंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना सीआयडीकडून अटक

आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना सीआयडीकडून अटक

स्किल डेव्हलपमेंट कॉरपोरेशन घोटाळयाप्रकरणी कारवाई

Google News Follow

Related

आंध्र प्रदेशमध्ये मोठ्या घडामोडी घडत असून चे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना शनिवार, ९ सप्टेंबर रोजी पहाटे गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) अटक केली. स्किल डेव्हलपमेंट कॉरपोरेशनमध्ये घोटाळा केल्याचा आरोप चंद्राबाबू नायडू यांच्यावर आहे. आंध्र प्रदेशमधील नंदयाला येथून नायडू यांना सीआयडीने अटक केली. तसेच त्यांचा मुलगा नारा लोकेश याला देखील पूर्व गोदावरी जिल्ह्यातून अटक करण्यात आली आहे.

तेलगू देसम पक्षाचे (टीडीपी) प्रमुख आणि आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांना अटक करण्यात आली आहे. एका भ्रष्टाचार प्रकरणी सीआयडीने नायडू यांच्यावर शनिवारी पहाटे कारवाई केली. त्यांच्यावर २०२१ मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

नंदयाल शहरातील आरके फंक्शन हॉलमध्ये असलेल्या कॅम्पमध्ये विश्रांती घेत असताना सीआयडीने ही कारवाई करत पहाटे ३ वाजता त्यांना अटक केली. चंद्राबाबू नायडू यांनी शुक्रवारी नंदयाल जिल्ह्यातील बनागनपल्ली येथे जाहीर सभेला संबोधित केले होतं. यानंतर नायडू आराम करत असताना शनिवारी पहाटे नायडू यांना अटक करण्यात आली. त्यांना अटक करण्यासाठी डीआयजी रघुरामी रेड्डी आणि नंदयाल रेंजचे सीआयडी यांच्या नेतृत्वाखाली मोठा पोलीस फौजफाटा दाखल होता.

या दरम्यान, पक्षाच्या कार्यकर्त्यांनी वाहनाला घेराव घालत चंद्राबाबू यांना अटक करण्यास विरोध दर्शविला. अखेर सीआयडीने त्यांना अटक केली. नायडू यांची चौकशी केल्यानंतर या प्रकरणाची सविस्तर माहिती आणि रिमांड अहवाल देण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले आहे. चंद्राबाबू नायडू यांचा मुलगा नारा लोकेश यांना पूर्व गोदावरी जिल्ह्यात पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

हे ही वाचा:

पाठीशी तीन भावंडे असलेला ‘गोविंदा’ झाला गंभीर जखमी, अर्धांगवायूने पीडित

बॉडी बॅग कथित घोटाळा प्रकरणी किशोरी पेडणेकरांविरोधात ईडीकडून गुन्हा दखल

पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या संपत्तीवर जप्ती!

राज्यात गडगडाटासह पावसाचे जोरदार कमबॅक

प्रकरण काय?

स्किल डेव्हलपमेंट कॉरपोरेशन घोटाळयामध्ये चंद्राबाबू नायडू यांना आरोपी एक म्हणून नाव देण्यात आलं आहे. जवळपास २५० कोटींहून अधिक रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. पोलीस अधिकार्‍यांनी चंद्राबाबू नायडू यांच्या वकिलांना स्किल डेव्हलपमेंट कॉरपोरेशन घोटाळा प्रकरणात आंध्रप्रदेश उच्च न्यायालयाने जारी केलेल्या एफआयआरची प्रत आणि इतर आदेशांची माहिती दिली आहे. अटक हा तपास प्रक्रियेचा प्राथमिक टप्पा असून, २४ तासांत रिमांड रिपोर्टमध्ये सर्व तपशील देण्यात येतील, असं पोलिसांनी सांगितलं आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा