25 C
Mumbai
Monday, January 17, 2022
घरक्राईमनामापेपरफुटी प्रकरणी आणखी एक पोलिसांकडे 'डेरे'दाखल

पेपरफुटी प्रकरणी आणखी एक पोलिसांकडे ‘डेरे’दाखल

Related

राज्यात टीईटी पेपरफुटी प्रकरणी पुणे पोलिसांनी कारवाईचा वेग वाढवला असून या प्रकरणी आणखी एक कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचे माजी अध्यक्ष सुखदेव डेरे यांना अटक केली आहे. त्यानंतर पोलिसांनी बंगळुरूमधून जीए टेक्नॉलॉजीच्या तत्कालीन संचालकालाही अटक केली आहे. या प्रकरणातील सहा जण सध्या पोलिसांच्या ताब्यात असून आणखी नावे समोर येण्याची शक्यता आहे.

टीईटी परीक्षेतील गैरप्रकार हे जीए टेक्नॉलॉजीला परीक्षा विभागाचे कंत्राट मिळाले तेव्हापासून म्हणजेच २०१७ पासून सुरू असल्याचे आता उघड झाले आहे. याच पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी कारवाई करत जीए टेक्नॉलॉजीचा तत्कालीन संचालक अश्विन कुमार बंगळुरूमधून अटक केली आहे. अश्विन कुमार हा आधीपासून या प्रकरणात अटकेत असलेल्या प्रीतीश देशमुखचा वरिष्ठ आहे.

दरम्यान पोलिसांनी महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचे आयुक्त सुखदेव डेरे यांनाही या प्रकरणी अटक केली आहे. डेरेंना संगमनेर तालुक्यातील त्यांच्या मुळ गावातून पोलिसांनी अटक केली. जीए टेक्नॉलॉजीला शिक्षण परिषदेकडून परीक्षा घेण्याचे कंत्राट मिळाले होते, तेव्हा म्हणजेच २०१७ मध्ये सुखदेव डेरे हे शिक्षण परिषदेचे आयुक्त होते. या सगळ्यांनी मिळून २०१८ साली झालेल्या टीईटी परीक्षेतही अशाचप्रकारे अपात्र उमेदवारांना पात्र ठरवल्याचे समोर आले आहे. जीए टेक्नॉलॉजी या कंपनीकडे २०१७ ते २०२० या काळात शिक्षण परिषदेच्या परीक्षा घेण्याचे कंत्राट होते. दरम्यानच्या काळात सुखदेव डेरे हे सेवानिवृत्त झाले.

हे ही वाचा:

एअर ऍम्ब्युलन्समध्ये ओदिशाचा पहिला नंबर

परीक्षा घोटाळा प्रकरणी तुकाराम सुपे निलंबित

कट्टरपंथी झाकीर नाईकच्या संघटनेवर भारतात बंदी

मतदार ओळखपत्राला नवा ‘आधार’! लोकसभेत विधेयक मंजूर

शिक्षण विभागाने सुपे यांना निलंबित केले असून सोमवारी २० डिसेंबरला त्यांच्या निलंबनाचा आदेश जारी करण्यात आला आहे. सुपे यांच्या घरावर मारलेल्या धाडीत आतापर्यंत ३ कोटींहून अधिक मुद्देमाल सापडला आहे. म्हाडाच्या परीक्षेसंदर्भात डॉ. प्रीतीश देशमुख यांच्या घरी केलेल्या छापेमारीत २०२०च्या टीईटी परीक्षेच्या विद्यार्थ्यांचे ओळखपत्र सापडले होते. या आधारे टीईटी परीक्षेसंदर्भात चौकशी करून तुकाराम सुपे यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर मिळालेल्या माहितीवरून या प्रकरणी आतापर्यंत सहा जणांना अटक करण्यात आली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
1,582अनुयायीअनुकरण करा
5,710सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा