32 C
Mumbai
Saturday, June 3, 2023
घरक्राईमनामाहरियाणाचे माजी मुख्यमंत्री चौटालांना चार वर्षांचा तुरुंगवास

हरियाणाचे माजी मुख्यमंत्री चौटालांना चार वर्षांचा तुरुंगवास

Google News Follow

Related

हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ओम प्रकाश चौटाला यांना बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी न्यायालयाने चार वर्षांचा तुरुंगवास आणि ५० लाखांचा दंड ठोठावला आहे. विशेष म्हणजे चौटाला यांनी आजारी असल्याने आणि केस जुनी असल्याने सहानुभूती मागितली होती. त्याचबरोबर भ्रष्टाचार हा समाजासाठी कर्करोगासारखा आहे, भ्रष्टाचाराच्या प्रकरणात न्यायालयाने अशी शिक्षा द्यावी, जेणेकरून समाजात एक आदर्श निर्माण होईल, असे सीबीआयने म्हटले होते.

याप्रकरणी न्यायालयात सुनावणी सुरु असताना चौटाला यांनी आपल्या जुन्या आजारपणाचे कारण देत सहानुभूतीपूर्वक विचार करण्याची न्यायालयाला विनंती केली होती. दरम्यान, सीबीआयने युक्तीवाद करताना म्हटलं होतं की, भ्रष्टाचार सामाजासाठी कर्करोगासमान आहे. भ्रष्टाचार प्रकरणी न्यायालयाने अश्या लोकांना शिक्षा दिली पाहिजे जी समाजासाठी एक आदर्श ठरेल.

सीबीआयने दाखल केलेल्या आरोपपत्रानुसार, चौटाला १९९३ ते २००६ दरम्यान ६.०९ कोटी रुपयांची संपत्ती जमा करण्यासाठी जबाबदार आहेत. मे २०१९ मध्ये, ईडीने ३.६ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली होती.
चौटाला यांना जानेवारी २०१३ मध्ये जेबीटी घोटाळ्यातही दोषी ठरवण्यात आले होते. २००८ मध्ये, चौटाला आणि ५३ इतरांवर १९९९ ते २००० या कालावधीत हरियाणामध्ये ३ हजार २०६ कनिष्ठ मूलभूत प्रशिक्षित शिक्षकांच्या नियुक्ती प्रकरणी आरोप ठेवण्यात आले होते.

हे ही वाचा:

‘मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द मोडला’

आर्यन खान सह ६ जणांना ड्रग्स प्रकरणात क्लीन चिट

‘रिसॉर्ट परबांचे नाही मग त्यांनी कर का भरला?’

स्टेडियममध्ये कुत्रा फिरवणाऱ्या आयएएस अधिकाऱ्याला पाठवले लडाखला

जानेवारी २०१३ मध्ये न्यायालयाने ओम प्रकाश चौटाला आणि त्यांचा मुलगा अजय सिंह चौटाला यांना भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत दहा वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली होती. चौटाला तीन हजारांहून अधिक अपात्र शिक्षकांची बेकायदेशीरपणे भरती केल्याप्रकरणी दोषी आढळले होते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,851चाहतेआवड दर्शवा
2,023अनुयायीअनुकरण करा
76,300सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा