29 C
Mumbai
Monday, October 3, 2022
घरराजकारणगुलाम आझाद यांचा काँग्रेसला रामराम, स्थापन करणार नवा पक्ष

गुलाम आझाद यांचा काँग्रेसला रामराम, स्थापन करणार नवा पक्ष

गुलाम नबी आझाद यांच्या राजीनाम्यानंतर जम्मू-काश्मीर काँग्रेसमधील पाच आमदारांनी राजीनामा दिला आहे.

Related

गुलाम नबी आझाद यांनी कॉंग्रेस पक्षाच्या सगळ्या पदांचा राजीनामा दिला. राजीनाम्यानंतर ते भाजपामध्ये प्रवेश करणार अशी चर्चा सुरु असतानाच, आपण जम्मू काश्मीरमध्ये स्वत:चा राजकीय पक्ष काढणार असल्याचे आझाद यांनी जाहीर केले आहे.

गुलाम नबी आझाद यांच्या राजीनाम्यानंतर जम्मू-काश्मीर काँग्रेसमधील पाच आमदारांनी राजीनामा दिला आहे. आझाद यांनी नवीन पक्ष स्थापन केला तर त्यांच्यासोबत जाणार, अशी भूमिका त्या पाच माजी आमदारांनी व्यक्त केली आहे.
गुलाम नबी आझाद यांनी पक्षातील सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. त्यांनी पक्षाचं प्राथमिक सदस्यत्वही सोडले आहे. गुलाम नबी आझाद यांनी अध्यक्षा सोनिया गांधी यांना पाच पानांचे पत्र पाठवत राजीनामा देत असल्याचे सांगितले आहे. राजीनामा देण्यापूर्वी त्यांनी १६ ऑगस्टला जम्मू काश्मीर काँग्रेस प्रचार समितीच्या प्रमुखपदाचा राजीनामा देत आपल्या नाराजीचे संकेत दिले होते.

गुलाम नबी आझाद यांनी राजीनामा दिल्यानंतर ते भाजपामध्ये प्रवेश करणार अशी चर्चा सुरु होती. मात्र, या चर्चेला त्यांनी विराम देत नवा पक्ष स्थापन करणार असल्याचं सांगितलं आहे. ते म्हणाले की, मी जम्मू-काश्मीरला जाणार असून मी राज्यात माझा स्वतःचा राजकीय पक्ष स्थापन करणार आहे. त्यानंतर संबंधित पक्ष राष्ट्रीय स्तरावर आणण्याबाबत चाचपणी करू. काँग्रेसबद्दल बोलताना ते म्हणाले, काँग्रेसने ‘भारत जोडो यात्रा’ सुरु केली आहे. मात्र त्यापेक्षा काँग्रेसने ‘काँग्रेस जोडो’ यात्रा सुरु करावी.

हे ही वाचा:

हिंदुत्वाला विरोध करणाऱ्या संभाजी ब्रिगेडशी शिवसेनेची युती

मुंबई पोलिसांच्या ट्राफिक कंट्रोल रूमला पुन्हा आला मेसेज

भाजपाकडून मढ येथील अनधिकृत स्टुडिओची पाहणी

उरीमध्ये लष्कराने तीन दहशतवाद्यांचा केला खात्मा

दरम्यान, गुलाम नबी आझाद यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसला जम्मू काश्मीरमध्ये मोठा धक्का बसला आहे. यापूर्वी काँग्रेसचे जेष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी राजीनामा दिला होता.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,969चाहतेआवड दर्शवा
1,945अनुयायीअनुकरण करा
41,900सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा