28 C
Mumbai
Tuesday, September 27, 2022
घरक्राईमनामामुंबई पोलिसांच्या ट्राफिक कंट्रोल रूमला पुन्हा आला मेसेज

मुंबई पोलिसांच्या ट्राफिक कंट्रोल रूमला पुन्हा आला मेसेज

एका भारताबाहेरील क्रमांकावरून मुंबई पोलिसांच्या ट्राफिक कंट्रोल रूमला मेसेज आला आहे.

Related

मुंबई पोलिसांच्या ट्राफिक कंट्रोल रूमला आज पुन्हा एक मेसेज मिळाला आहे. मात्र, हा मेसेज धमकीचा नसल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, या मेसेजमुळे मुंबई पोलीस आणि सुरक्षा यंत्रणा अलर्टवर आल्या आहेत.

एका भारताबाहेरील क्रमांकावरून मुंबई पोलिसांच्या ट्राफिक कंट्रोल रूमला मेसेज आला आहे. सोमालियाप्रमाणे भारतात मुंबईत हल्ला होऊ नये यासाठी काळजी घ्या असा मेसेज आला आहे. संबंधित मेसेज संबंधी पोलिसांकडून तपास सुरू असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं आहे.

सोमालियातील  मोगादिशू येथील एका हॉटेलवर अल-शबाब या दहशतवादी गटाच्या दहशतवाद्यांनी एका हॉटेलवर हल्ला केला होता. हा हल्ला मुंबई २६/११ च्या हल्ल्यासारखा असल्याची माहिती समोर आली होती. अल-शबाब (Al-Shabaab) या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. तर या हल्ल्यात आतापर्यंत ११ जणांचा मृत्यू झाला होता तर नऊ जण जखमी झाले होते.

हे ही वाचा:

भाजपाकडून मढ येथील अनधिकृत स्टुडिओची पाहणी

उरीमध्ये लष्कराने तीन दहशतवाद्यांचा केला खात्मा

‘या’ दिवशी नागपूरमध्ये सुरू होणार हिवाळी अधिवेशन

प्रज्ञानंद प्रार्थना करून बुद्धिबळ खेळयला करतो सुरुवात

मुंबई पोलिस ट्रॅफिक कंट्रोल रुमला २० ऑगस्ट रोजी धमकीचा मेसेज आला होता. २६/११ सारखा भयानक हल्ला पुन्हा एकदा करणार असल्याची धमकी या मेसेजमधून देण्यात आली होती. हा हल्ला करण्यासाठी भारतातलेच सहा लोक मदत करणार असल्याचंही त्यात लिहिण्यात आलं होतं. कंट्रोल रुमच्या नंबरवर भारताच्या बाहेरील क्रमांकावरून मेसेज आले असून हे धमकीवजा मेसेजेस पाकिस्तानमधून आल्याचे म्हटले जात होते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,965चाहतेआवड दर्शवा
1,942अनुयायीअनुकरण करा
40,400सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा