26 C
Mumbai
Sunday, September 25, 2022
घरराजकारणहिंदुत्वाला विरोध करणाऱ्या संभाजी ब्रिगेडशी शिवसेनेची युती

हिंदुत्वाला विरोध करणाऱ्या संभाजी ब्रिगेडशी शिवसेनेची युती

बळ वाढवण्याच्या नावाखाली सातत्याने हिंदुत्वाचा विरोध करणाऱ्या संभाजी ब्रिगेडशी शिवसेनेने युती केली आहे.

Related

शिवसेनेला वाचवण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आता संभाजी ब्रिगेडशी युती केली आहे. उद्धव ठाकरे यांनी शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड यांच्या युतीची घोषणा केली आहे. आगामी निवडणुकांमध्ये शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड एकत्र येतील, असे ठाकरे यांनी सांगितलं आहे.

बळ वाढवण्याच्या नावाखाली सातत्याने हिंदुत्वाचा विरोध करणाऱ्या संभाजी ब्रिगेडशी शिवसेनेने युती केली आहे. शिवसेना भवनाच्या इमारतीवर पुढील भागात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात आला आहे आणि या पुतळ्याच्या वरच्या भागात दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचं मोठं छायाचित्र लावण्यात आलं आहे. यावर संभाजी ब्रिगेडने आक्षेप घेतला होता. बाळासाहेबांचं चित्र हटवण्याची मागणी ब्रिगेडनं केली होती. तर २०१६ मध्ये मराठा मोर्चाबाबत ‘सामना’मध्ये प्रसिद्ध झालेल्या व्यंगचित्रावरून वाद झाला होता. त्यानंतर सामना कार्यालयावर आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनाची जबाबदारी पुढे संभाजी ब्रिगेडने घेतली होती. २०१२ साली संभाजी ब्रिगेडनं रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी फोडून कुत्र्याचा पुतळा दरीत फेकला होता. हा शिवाजी महाराजांचा कुत्रा नव्हता, असं म्हणणं संभाजी ब्रिगेडचं होतं.

एकूणच राजकीय इतिहासात संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना अनेकदा आमने-सामने आले आहेत. मात्र, आता शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड एकत्र वाटचाल करणार असल्याच्या निर्णयावर आली आहे. हिंदुत्वाचा विरोध करणाऱ्या संभाजी ब्रिगेडशी शिवसेनेने युती केल्यामुळे उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला जात आहे.

“खोटा इतिहास सांगण्याचे आणि थापा मरण्याचे कौशल्य हे उद्धव ठाकरे आणि ब्रिगेड मधील समान धागा आहे, त्यामुळे ही युती नैसर्गिक आहे,” असा सणसणीत टोला भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी लगावला आहे.

हे ही वाचा:

मुंबई पोलिसांच्या ट्राफिक कंट्रोल रूमला पुन्हा आला मेसेज

भाजपाकडून मढ येथील अनधिकृत स्टुडिओची पाहणी

उरीमध्ये लष्कराने तीन दहशतवाद्यांचा केला खात्मा

‘या’ दिवशी नागपूरमध्ये सुरू होणार हिवाळी अधिवेशन

“संभाजी ब्रिगेड ही राष्ट्रवादी कांग्रेसचीच बी टीम आहे. या संघटनेने नेहमीच हिंदुत्वविरोधी भूमिका घेतली आहे. मग बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना संभाजी ब्रिगेडसोबत कशी जाऊ शकते. शिवसेनेच्या या निर्णयामुळे सामान्य शिवसैनिकांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे,” अशी टीका मनसे नेते गजानन काळे यांनी केली आहे.

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, पेशवे यांना टोकाचा विरोध ही या संभाजी ब्रिगेडची ओळख आहे. ब्राह्मणविरोधावर पोसले गेलेले हे संघटन आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,967चाहतेआवड दर्शवा
1,943अनुयायीअनुकरण करा
39,800सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा