30 C
Mumbai
Sunday, December 5, 2021
घरक्राईमनामाश्रीनगरमध्ये आता हिंदू पाणीपुरीवाल्याचीही हत्या

श्रीनगरमध्ये आता हिंदू पाणीपुरीवाल्याचीही हत्या

Related

आज श्रीनगरमध्ये दहशतवाद्यांनी बिहारमधील पाणीपुरीवाल्याची गोळ्या घालून हत्या केली. गेल्या दोन आठवड्यांमधली ही आठवी हत्या आहे. जम्मू काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात उत्तर प्रदेशातील एका सुतारावरही दहशतवाद्यांनी गोळ्या झाडल्या, ज्यामुळे तो गंभीर जखमी झाला.

“दहशतवाद्यांनी श्रीनगर आणि पुलवामा येथे दोन स्थानिक नसलेल्या मजुरांवर गोळीबार केला. बिहारमधील बांका येथील अरबिंद कुमार साह यांचा श्रीनगरमध्ये मृत्यू झाला. तर उत्तर प्रदेशातील सगीर अहमद पुलवामा येथे गंभीर जखमी झाले आहेत. आसपासच्या परिसराला सील करण्यात आले असून दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे.” जम्मू काश्मीर पोलीस एका ट्विटमध्ये म्हटले आहे.

दहशतवाद्यांनी पाणीपुरीवाल्यावर जवळून गोळ्या झाडल्या. अशी माहिती सूत्रांनी दिली. गेल्या आठवड्याभरात काश्मीरमध्ये झालेल्या या हत्याकांडामध्ये अनेक हिंदू, शिखांची हत्या करण्यात आली. अनेक काश्मिरी कुटुंब आणि अधिकारी ज्यांना काश्मीर खोऱ्यात नोकऱ्या देण्यात आल्या होत्या ते शांतपणे खोरं सोडून निघून गेले आहेत.

“श्रीनगरमध्ये आज झालेल्या दहशतवादी हल्ल्यात रस्त्यावरील विक्रेता अरविंद कुमारच्या हत्येचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो. याप्रमाणे नागरिकांना लक्ष्य केल्याची ही आणखी एक घटना आहे. अरविंद कुमार हे रोजगाराच्या शोधात श्रीनगरला आले होते. ही हत्या झाली हे निंदनीय आहे.” जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी ट्विट केले.

जम्मू-काश्मीर पीपल्स कॉन्फरन्सचे नेते साजाद लोन यांनी ट्विट केले, “ही शुद्ध दहशत आहे. पुन्हा एका बिगर स्थानिक विक्रेत्याला गोळ्या घालून ठार मारले आहे. अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे.”

गेल्या दोन आठवड्यांत आठ पैकी पाच बळी मुस्लिम नव्हते, हे स्पष्ट संकेत आहे की हिंदू आणि बाहेरील लोक हल्ल्यांचे मुख्य लक्ष्य आहेत.

जम्मू -काश्मीरमध्ये फुटीरतावाद्यांशी संबंध असल्याच्या संशयावरून पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर कारवाई केली आणि सुमारे ९०० लोकांना ताब्यात घेतले.

हे ही वाचा:

ब्रिटिश खासदाराची चाकूने भोसकून हत्या

वाझे तुरुंगात जाऊनही ठाकरे सरकारमध्ये महावसूली सुरूच

लखबीर सिंगच्या निर्घृण हत्येप्रकरणी निहंग शीख ताब्यात

महाविकास आघाडी पुन्हा बंदची हाक देणार का?

पोलिसांनी दहशतवादविरोधी कारवायाही तीव्र केल्या आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या एका आठवड्यात १३ जणांचा बळी गेला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
1,510अनुयायीअनुकरण करा
4,880सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा