30 C
Mumbai
Monday, May 13, 2024
घरराजकारणशरद पवार पुन्हा भिजले!

शरद पवार पुन्हा भिजले!

सुप्रिया सुळेंनी ट्विट करत पवारांच्या भिजण्यावरून पुन्हा साधली संधी

Google News Follow

Related

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षात फूट पडल्यानंतर येवल्यात सभा घेतली. त्याआधी ते सभास्थळी येताना वेगवेगळ्या ठिकाणी लोकांना भेटत होते त्यावेळी अचानक आलेल्या पावसात ते भिजले. गाडीत चिंब भिजलेल्या पवारांचा फोटो त्यांची कन्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट केला आणि वडिलांचे कौतुक केले. २०१९च्या लोकसभा निवडणुकीत शरद पवार हे साताऱ्याच्या सभेत भिजले होते आणि त्यातून निवडणुकीत राष्ट्रवादीला फायदा झाला होता, असे मानले जात होते. त्याची आठवण यानिमित्ताने पुन्हा करून दिली गेली.

सुप्रिया सुळे यांनी आपल्या ट्विटमध्ये आपल्या कार्यकर्त्यांना भावनिक आवाहन करताना भाग गए रणछोड भी, देख अभी खडा हूँ मै, ना थका हूँ, ना हारा हूँ, रण मे अटल खडा हूँ मै अशी कविता फोटोसोबत शेअर केली. आपल्याला लोक सोडून गेले तरी आपण थकलेलो नाही, युद्धासाठी रणामध्ये खंबीरपणे उभा आहे, असे सुप्रिया सुळे यांना या कवितेच्या माध्यमातून दाखवायचे होते.२०१९मध्ये साताऱ्यातील सभेत शरद पवार असेच भिजले होते आणि त्यामुळे राष्ट्रवादीला त्यांच्या भिजण्याचा फायदा झाला होता, असे मानले जाते. आता शरद पवार भिजल्यामुळे आगामी निवडणुकीतही त्यांना याचा फायदा होईल, असा विश्वास कार्यकर्ते व्यक्त करू लागले. ८३ वर्षांचा योद्धा अशी उपमाही पवारांना देण्यात आली.

हे ही वाचा:

भारतात आलेल्या ‘सीमा’ला पुन्हा पाकिस्तानात पाठवा… मोदी सरकारकडे विनंती!

ब्रिटनला भारताने ठणकावले; भारतविरोधी कट्टरपंथीयांविरोधात कठोर कारवाई करा

शरद पवार म्हणाले की, भाजपाशी चर्चा केली होती; पण विचारधारेमुळे पुढे पाऊल टाकले नाही

‘आदिपुरुष’ प्रकरणी मनोज मुंतशीरकडून जाहीर माफी!

बापाला कितीवेळा भिजवणार?

यावर भाजपाचे नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी टीका केली. ते म्हणाले की, मुलगी म्हणजे शहाळ्याचे पाणी. पुन्हा पुन्हा भिजलेल्या बापाची कहाणी. शिवाय, त्यांनी असेही म्हटले की, २०१९मध्ये भिजूनही तुमचे ५४ आमदारच आले. तुमचं राजकारण आता थिजून गेलंय. त्यामुळे पुन्हा भिजून काही होणार नाही. सुप्रिया सुळे या वयात आपल्या बापाला किती वेळा भिजवणार?

येवल्यातील सभेपूर्वीही पवारांनी आपल्या कार्यकर्त्यांसाठी पुष्पा चित्रपटाचा आधार घेतला. ते म्हणाले की,ना टायर्ड हूँ, ना रिटायर्ड हूँ, फायर हूँ.
प्रत्यक्ष सभेत शरद पवार यांनी आपला अंदाज चुकल्याची कबुलीही दिली. अजित पवारांवर टीका करताना आपण याठिकाणी टीका करण्यासाठी आलेलो नाही तर माफी मागायला आलो आहोत असे म्हणत पुन्हा एकदा त्यांनी कार्यकर्त्यांच्या भावनेला हात घालण्याचा प्रयत्न केला. आपला अंदाज चुकल्याचे म्हणत कार्यकर्त्यांना आपल्या बाजुला वळविण्याचा प्रयत्नही त्यांनी केला.
शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आवाहन केले की, आम्ही भ्रष्टाचार केला असेल तर आमची चौकशी करा आणि आम्हाला शिक्षा द्या.

वयाच्या भानगडीत पडू नका
अजित पवारांनी शरद पवारांच्या वयावरून केलेली टीका त्यांना चांगलीच झोंबली. येवल्याच्या सभेत शरद पवार म्हणाले, काही लोकं म्हणतात, तुमचं वय झालंय. वय झालं हे खरं आहे. पण, निवृत्त व्हा. असं म्हणू नका. वयाच्या भानगडीत पडू नका. गडी काय हे पाहिलचं नाही. काय टीका करायची ‌ती करा. पण वय आणि व्यक्तिगत टीका करू नका, असंही शरद पवार यांनी सुनावलं.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
152,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा