27 C
Mumbai
Saturday, October 5, 2024
घरराजकारणमनोज जरांगे पाटील यांना संभाजीराजेंनी दिला पाठिंबा

मनोज जरांगे पाटील यांना संभाजीराजेंनी दिला पाठिंबा

मनोज जरांगे यांच्या भेटीनंतर छत्रपती संभाजीराजेंची प्रतिक्रिया

Google News Follow

Related

राज्य सरकारला दिलेला अल्टिमेट संपल्यानंतर आज पुन्हा मनोज जरांगे यांनी आक्रमक भूमिका घेऊन उपोषणाला सुरुवात केली.छत्रपती संभाजी राजेंनी आज मनोज जरांगे पाटलांची भेट घेत त्यांना पाणी पिण्याचा आग्रह करत पाणी पाजले. मराठा समाजाला हक्काचे आरक्षण मिळविण्यासाठी गेली अनेक दशके विविध संविधानिक मार्गांनी लढा सुरू आहे. मनोज जरांगे पाटील यांना बळ देण्यासाठी मी कायमच उभा होतो आणि यापुढेही असणार आहे, असे ट्विट मनोज जरांगे पाटलांच्या भेटीनंतर संभाजी राजेंनी केले. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी उपोषणाच्या दुसऱ्या अध्यायाला सुरुवात केली आहे.

त्यानंतर मनोज जरांगे यांनी आज जालना येथे आंदोलनाची सुरुवात केली.आज छत्रपती संभाजी राजे यांनी मनोज जरांगे यांच्या आंदोलन स्थळी भेट दिली. मराठा समाजाचा आरक्षणाचा तिढा लवकरात लवकर सुटावा व गरीब मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचे संभाजी राजे म्हणाले. छत्रपती संभाजी राजे यांनी उपोषण स्थगित करण्याची विनंती करत पाणी पिण्याची मागणी केली. त्यानंतर मनोज जरांगे यांनी पाणी पीत आजचे आंदोलन स्थगित केले व उद्यापासून पुन्हा उपोषणाला बसणार असल्याचे सांगितले.

हे ही वाचा:

जरांगे पाटलांच्या आमरण उपोषणाला पुन्हा सुरुवात

धुळ्यात टिपू सुलतानाचा पुतळा; आमदार फारुक शाहविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी!

युएन प्रमुखांकडून इस्रायल- हमासमध्ये युद्धविराम करण्याची मागणी

पवारांची संघर्षयात्रा काय घडवणार?

मनोज जरांगे यांच्या भेटीनंतर छत्रपती संभाजी राजेंनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली.ते म्हणाले, मराठा समाजाला हक्काचे आरक्षण मिळविण्यासाठी गेली अनेक दशके विविध संविधानिक मार्गांनी लढा सुरू आहे. मनोज जरांगे पाटील या सामान्य शेतकरी कुटुंबातील युवकाने मराठा आरक्षणासाठी उभारलेला लढा लोक चळवळ झाली आहे. मनोज जरांगे पाटील यांना बळ देण्यासाठी मी कायमच उभा होतो आणि यापुढेही असणार आहे.

राजेंचा शब्द म्हणून पाणी घेतले

छत्रपती संभाजी राजेंच्या भेटीबाबत मनोज जरांगे म्हणाले, छत्रपती संभाजीराजेंचा आदर आणि सन्मान म्हणून केवळ आजच्या दिवसासाठी पाणी घेणार, पण उद्यापासून पुन्हा आंदोलन सुरू करणार असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला. आजचा दिवस पाणी पिऊन आपण राजेंचा शब्द मोडत नसल्याच सांगिंतलं. आज पाणी ग्रहण केलं मात्र उद्यापासून आपण पाणीही घेणार नसल्याचं मनोज जरांगे यांनी स्पष्ट केलं.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
180,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा