29 C
Mumbai
Wednesday, May 18, 2022
घरराजकारण'हनुमान चालीसा वाचायची असेल आपल्या घरात वाचा'

‘हनुमान चालीसा वाचायची असेल आपल्या घरात वाचा’

Related

सध्या राज्यात हनुमान चालीसा आणि भोंग्यांवरून वाद सुरु आहे. राज्यातील दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण केला जात असल्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले आहेत. राणा दाम्पत्य हे हनुमान चालीसा पठणासाठी मुंबईत दाखल झाले आहेत. त्यावरून वळसे पाटील म्हणाले, ज्यांना हनुमान चालीसा वाचायची आहे त्यांनी आपल्या घरी वाचावी. त्यासाठी रस्त्यावर उतरण्याची गरज नसल्याचे पाटील म्हणाले आहेत.

पत्रकार परिषदेत दिलीप वळसे पाटील म्हणाले,  एखाद्या ठिकाणी जर दुर्दवी घटना घडली तर संपूर्ण मुंबईतील कायदा-सुव्यवस्था बिघडली अशा निष्कर्षाला येणे योग्य नाही. त्यामुळे राणा दाम्पत्यांनी हट्ट करू नये. तसेच याविरोधात अनावश्यकरीत्या रस्त्यावर उतरुन वर्तन करणे चुकीचे असल्याचे पाटील म्हणाले. दुसरीकडे मात्र अनावश्यक रस्त्यावर उतरून खुद्द शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनीच घोषणाबाजी आणि राणा दाम्पत्यांच्या इमारतीत घुसण्याचा प्रयत्न केला आहे. एवढेच नव्हे तर राणा दाम्पत्यांच्या अमरावतीतील घराबाहेर शिवसैनिकांनी दगडफेक केली आहे.

हे ही वाचा:

‘राणांच्या घरावर हल्ला करा, असे आदेश मुख्यमंत्र्यांनीच दिले’

‘मातोश्री मंदिर आहे तर, आम्हाला का रोखले जात आहे’

झवेरी बाजारात भिंतीत लपवले होते १० कोटी आणि चांदीच्या विटा

केरळमध्ये, पश्चिम बंगालमध्येही घाबरलो नाही, तर महाराष्ट्रात घाबरायचा प्रश्नच नाही.

मुख्यमंत्री किंवा मी गृहमंत्री म्हणून कोणत्याही प्रकारचे निर्देश देत नाही. यामध्ये युनिट कमांडर म्हणजे पोलीस आयुक्तांनी निर्णय घेऊन कारवाई करायची असते. राज्यात राष्ट्रपती राजवट लावणयासाठी भाजपाकडून अशी मागणी केली जात आहे. आता हनुमान चालिसा कोणाला वाचायची असेल तर ज्याने त्याने ती आपल्या घरी वाचावी. एखाद्या ठिकाणीच जाऊन ती वाचायची हा हट्ट कशासाठी? असा सवाल वळसे यांनी केला आहे. दरम्यान, आज सर्व पक्षातील मोठ्या नेत्यांशी बैठक घेऊन भोंग्यासंदर्भात काय भूमिका घ्यायची यावर चर्चा करणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,978चाहतेआवड दर्शवा
1,883अनुयायीअनुकरण करा
9,330सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा