25 C
Mumbai
Thursday, December 25, 2025
घरराजकारणआपण तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर भारत पहिल्या तीन अर्थव्यवस्थांमध्ये

आपण तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर भारत पहिल्या तीन अर्थव्यवस्थांमध्ये

पंतप्रधान मोदींनी दिली 'गॅरंटी’

Google News Follow

Related

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या तिसऱ्या कार्यकाळात भारत जगातील पहिल्या तीन अर्थव्यवस्थांमध्ये आपले स्थान सुरक्षित करेल, असा दावा केला आहे. भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी लोकसभा निवडणुकीत जिंकल्यास आणि मी तिसर्‍यांदा पंतप्रधान म्हणून परत आल्यास भारत जगातील पहिल्या तीन अर्थव्यवस्थांमध्ये असेल, अशी हमी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे.  

बुधवारी दिल्लीतील प्रगती मैदानावर सुधारित आयटीपीओ संकुलाचे उद्‌घाटन केल्यानंतर एका मेळाव्याला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, “माझ्या तिसऱ्या कार्यकाळात भारत आघाडीच्या तीन देशांमध्ये असेल. ही मोदीची गॅरंटी आहे,’ सन २०२४नंतर भारताच्या विकासाचा प्रवास वेगवान होईल, असे मी या देशातील जनतेला आश्वासन देऊ इच्छितो, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. काही लोकांची टीकाटिप्पणी करण्याची आणि चांगले काम बंद करण्याची वाईट प्रवृत्ती आहे, अशा शब्दांत त्यांनी विरोधकांवर टीका केली.  

‘कर्तव्यपथ’ बांधला जात होता तेव्हा अनेक गोष्टी वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर ब्रेकिंग न्यूज म्हणून चालू होत्या. न्यायालयातही त्यावर आवाज उठवला गेला होता, परंतु जेव्हा तो बांधला गेला तेव्हा तेच लोक म्हणाले की, हे चांगले आहे. मला खात्री आहे की ही ‘टोळी’ ‘भारतमंडपम्’ देखील स्वीकारतील आणि ते येथे व्याख्यान देण्यासाठी येण्याचीही शक्यता आहे,” असेही ते म्हणाले.

हे ही वाचा:

उद्धव ठाकरेंना अजूनही प्रश्न; हिंदुत्व सोडलं म्हणजे काय?

मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार उसळला; ३० घरे पेटवली

राज्यपाल नियुक्त १२ आमदारांचा फॉर्म्युला ठरला; तीन पक्षांमध्ये ‘अशी’ होणार वाटणी

मिठी साफ करता आली नाही, ते मोदींना प्रश्न विचारतायत…

पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते दिल्लीत ड्रोनद्वारे नवीन आयटीपीओ संकुल ‘भारत मंडपम्’चे उद्घाटन केले. त्यांनी पुनर्विकसित इंडिया ट्रेड प्रमोशन ऑर्गनायझेशन (आयटीपीओ) संकुलातही पूजा केली. येथे सप्टेंबरमध्ये जी २० परिषद होणार आहे. हे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन व कन्व्हेन्शन सेंटर (आयईसीसी) जगातील अग्रगण्य प्रदर्शन आणि संमेलन संकुलांपैकी एक असेल, असा दावा करण्यात आला आहे.  

प्रगती मैदानावरील जुन्या आणि कालबाह्य संरचनांच्या दुरुस्तीनंतर बांधण्यात आलेली ही सुविधा सुमारे २७०० कोटी रुपये खर्चून राष्ट्रीय प्रकल्प म्हणून विकसित करण्यात आली होती. सुमारे १२३ एकर जमिनीवर हा परिसर वसला आहे. आईसीसी कॉम्प्लेक्स हे भारतातील सर्वात मोठे ‘एमआयसीई (मीटिंग्ज, इन्सेंटिव्ह, कॉन्फरन्स आणि एक्झिबिशन) डेस्टिनेशन’ म्हणून विकसित केले गेले आहे. यामध्ये कन्व्हेन्शन सेंटर, एक्झिबिशन हॉल आणि अॅम्फीथिएटर्ससह अनेक अत्याधुनिक सुविधांचा समावेश आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
285,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा