भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी मराठवाडा आणि विदर्भ वैधानिक विकास महामंडळाबाबत राज्यपालांशी चर्चा केली. दोन्ही वैधानिक विकास महामंडाळांचा कालावधी ३० एप्रिल २०२० ला संपलेला आहे. मात्र, विदर्भ आणि मराठवाड्यासाठी हे महामंडळ गरजेचे आहे. त्यामुळे सरकारने ऐकले नाही तर याद राखा. विदर्भ आणि मराठवाड्यासाठी आम्ही सरकारला सोडणार नाही, असा इशारा मुनगंटीवार यांनी ठाकरे सरकारला दिला आहे.
११ फेब्रुवारीला ठाकरे सरकारने महामहीम राज्यपालांना विमानातून उतरायला भाग पाडले होते. विमानात बसल्यावर राज्यपालांना परवानगी नसल्याचे सांगण्यात आले होते. त्यामुळे राज्यपालांना खाजगी विमानाने उत्तराखंडला जावे लागले होते. महाराष्ट्रात आजवर कोणत्याही सरकारने राज्यपालांचा या पद्धतीने अपमान केला नव्हता.
हे ही वाचा:
राज्य सरकार १२ आमदारांच्या नियुक्तीवरुन राज्यपालांशी खुला संघर्ष करत आहे. दुसरीकडे वेगवेगळ्या विभागांचा असमतोल विकास करायचा आणि तिजोरीवर डाका टाकायचा. सरकारमध्ये सध्या हेच सुरु असल्याचा गंभीर आरोप मुनगंटीवार यांनी केला आहे. विदर्भ आणि मराठवाडा वैधानिक विकास महामंडळासाठी टोकाचा संघर्ष करणार असल्याचा दावाही त्यांनी केलाय. इतकच नाही तर विधानसभेत याबाबत हक्कभंग आणणार असल्याची घोषणाही मुनगंटीवारांनी केली आहे.







