33 C
Mumbai
Thursday, May 16, 2024
घरराजकारणराज्यपालांचा ठाकरे सरकारकडून पुन्हा अपमान

राज्यपालांचा ठाकरे सरकारकडून पुन्हा अपमान

Google News Follow

Related

ठाकरे सरकार आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यातील वाद शमताना दिसत नाही. ठराविक दिवसांनी सरकार विरुद्ध राज्यपाल यांच्यातील वाद उफाळून येत आहे. आता तर राज्यपालांच्या हवाई प्रवासाला मुख्यमंत्री कार्यालयाने परवानगीच नाकारल्याचे वृत्त समोर आले आहे. राज्यपाल कोश्यारी विमानात बसल्यानंतर त्यांना परवानगी नसल्याचं कळलं. त्यामुळे राज्यपालांवर विमानातून उतरुन परत राजभवनावर येण्याची वेळ ओढावली आहे. मुख्यामंत्री कार्यालयातून राज्यपालांचा पुन्हा एकदा अपमान करण्यात आला आहे.

मुख्यमंत्री कार्यालयाकडून याबाबत कोणताही प्रतिसाद आलाच नाही. त्यामुळे राज्यपाल विरुद्ध ठाकरे सरकार हा वाद आणखी गडद होताना दिसत आहे.राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे उत्तराखंडकडे जात होते. त्यावेळी ते सरकारी विमानाने निघाले होते. मात्र राज्यपालांच्या या प्रवासाला ठाकरे सरकारने परवानगीच दिली नसल्याचे समोर आले आहे.

ठाकरे सरकार आणि राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांच्यातील वाद ठाकरे सरकार इतकाच जुना आहे. परंतु महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच कोणत्याही सरकारकडून राज्यपालांचा अशा पद्धतीने अपमान करण्यात आलेला आहे.

उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री असलेले भगतसिंह कोश्यारी हे हिमकडा कोसळून झालेल्या दुर्घटनेची पाहणी करण्यासाठी जात असल्याची माहिती आहे. कोश्यारींनी रविवारीच या घटनेविषयी खेद व्यक्त करत मृतांना श्रद्धांजली वाहिली होती. “राज्यपालांना विमानातून उतरवण्यातं आलं, जनता सरकारला सत्तेतून उतरवेल.” अशी टीका भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केली.”राज्यपालांचं विमान सरकारच्या माध्यमातून नाकारलं असेल तर हे दमनकारी आहे. लोकशाही व्यवस्थेत हे घडणं योग्य नाही. सरकारकडून असं घडलं असेल तर त्यानी क्षमा मागून हा विषय इथेच थांबवावा. कोणत्या अधिकाऱ्याकडून घडलं असेल तर त्याला तात्काळ बडतर्फ करण्यात यावं.” अशी मागणी भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
153,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा