35 C
Mumbai
Monday, April 29, 2024
घरराजकारणवसई-विरार महानगरपालिकेत हितेंद्र ठाकूरना धक्का बसणार?

वसई-विरार महानगरपालिकेत हितेंद्र ठाकूरना धक्का बसणार?

Google News Follow

Related

वसई-विरार  महानगरपालिकेची तिसऱ्या निवडणुकीची आचारसंहिता लवकरच लागू होण्याची शक्यता आहे. सध्या महापालिकेवर बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर यांची एकहाती सत्ता आहे. ठाकूर यांच्या एकहाती सत्तेला खिंडार पाडण्यासाठी भाजपा, महाविकास आघाडी आणि मनसेनेही आतापासूनच कंबर कसली आहे.

११५ नगरसेवकांपैकी तब्बल १०७ नगरसेवक हे हितेंद्र ठाकूर यांच्या बविआचे आहेत. शिवसेनेचे 5 नगरसेवक आहेत, तर भाजपा, मनसे यांचे प्रत्येकी एक-एक नगरसेवक आहेत. याशिवाय एक नगरसेवक अपक्ष निवडून आला आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा एकही नगरसेवक वसई विरार महापालिकेवर निवडून आलेला नाही. वसई विरार महापालिकेवर हितेंद्र ठाकूर यांचे अनेक वर्षांपासून निर्विवाद वर्चस्व आहे.

भाजपकडून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, महाविकास आघाडीकडून नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, शिवसेनेचे पालघर जिल्हा संपर्क प्रमुख आमदार रवींद्र फाटक तर मनसेकडून पालघर-ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवली जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षाकडून व्यूहरचना तयार करण्यात येत आहे. लॉकडाऊनच्या काळात केलेल्या कामाचा दाखला देत यंदाच्या निवडणुकीत सर्वच ११५ जागा जिंकणार, असा विश्वास बहुजन विकास आघाडीकडून व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे येणारी महापालिका निवडणूक चुरशीची होणार यात शंकाच नाही.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
149,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा