28.7 C
Mumbai
Wednesday, October 28, 2026
घरधर्म संस्कृतीमहाराष्ट्रात हा तालिबानी कारभार सुरू आहे का ?

महाराष्ट्रात हा तालिबानी कारभार सुरू आहे का ?

Google News Follow

भाजपा नेते आमदार ऍड. आशिष शेलारची खरमरीत टीका

दहीहंडी पारंपरिक पद्धतीने साजरी करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करणाऱ्या आणि दडपशाहीचा कारभार करणाऱ्या ठाकरे सरकारचा महाराष्ट्रात तालिबानी कारभार सुरू आहे का? अशा शब्दांत भाजपा नेते आमदार ऍड. आशिष शेलार यांनी सरकारवर खरमरीत टीका केली आहे.

दहीहंडी उत्सव पारंपरिक पध्दतीने आणि गर्दी न करता साजरा करण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाजपा कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. आमदार राम कदम यांच्यासह उत्सव साजरा करणाऱ्यांना मज्जाव करण्यात आला. डोंगरी येथे माझ्या उपस्थितीत जो पारंपरिक उत्सव साजरा होणार होता त्यावर काल रात्री पासून पोलिसांनी बंदी आणून आयोजकांवर दडपशाहीचा वापर करण्यात आला.

कुलाब्यात कोकण विकास आघाडीचे पदाधिकारी कमलाकर दळवी यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. सोमवारी मुंबईत ठिकठिकाणी हेच चित्र होते भाजपाच्या कार्यकर्त्यांना अशाच पध्दतीने दडपशाहीचा अनुभव आज आला. आम्ही ठाकरे सरकारच्या या कारभाराचा निषेध करतो.

गणेशोत्सव काळात पण असाच पोलीस बळाचा वापर केलात तर आम्ही शांततेने कायद्याचा सन्मान केला, पण गणेशोत्सवात अशी दडपशाही सहन करणार नाही. नियम पाळून शांतपणे गणेशोत्सव साजरा करू द्या, अन्यथा आम्ही आक्रमक भूमिका घेऊ, असा इशाराही ऍड. आशिष शेलार यांनी दिला आहे.

हे ही वाचा:

टेस्लाची ‘ही’ चार मॉडेल्स भारतात

काश्मीरही काफ़िरांपासून ‘मुक्त’ करा

‘हे तुमच्यासाठी…’ खास व्यक्तीसाठी रोनाल्डोने लिहिली भावनिक पोस्ट

२५ भारतीय आयएसआयएसमध्ये सामील

दरम्यान, गर्दीची कारणे सांगून उत्सवावर बंदी आणत आहात मग, पब, डिस्को,बार कसे सुरु आहेत? जे “वाटाघाटी” करतात त्यांना परवानगी आणि उत्सवांंवर कायद्याने बंदी? हा कसला कारभार? असा टोलाही आमदार ऍड.आशिष शेलार यांनी प्रसिद्धपत्रातून लगावला आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
340,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा