भारतात लोकशाही निवडणूक पार पडत असताना भारताचा शेजारी देश असलेला पाकिस्तानमधून अनेक नेत्यांनी इंडी आघाडीला आणि काँग्रेसला सत्तेत येण्यासाठी म्हणून उघड पाठींबा दिला आहे. यावरून भाजपाने काँग्रेस आणि इंडी आघाडीवर निशाणाही साधला होता. पाकिस्तानचे माजी मंत्री फवाद चौधरी यांनी सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीत विरोधकांना पाठिंबा देण्याचा पुनरुच्चार केला आहे. मंगळवार, २८ मे रोजी पाकिस्तानी नेते फवाद चौधरी म्हणाले की, भारतात सुरू असलेल्या निवडणुकीत पंतप्रधान मोदींचा पराभव व्हावा, अशी प्रत्येक पाकिस्तानीची इच्छा आहे. तसेच फवाद चौधरी यांनी राहुल गांधी, अरविंद केजरीवाल आणि ममता बॅनर्जी यांना शुभेच्छा दिल्या आहेत. यावरून आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
आयएएनएस या वृत्तसंस्थेशी बोलताना फवाद चौधरी यांनी म्हटले की, काश्मीर आणि भारतातील मुस्लिमांवर अतिरेकी विचारसरणीमुळे अत्याचार केले जात आहेत ज्यामुळे पंतप्रधान मोदींना पराभूत करणे महत्त्वाचे आहे. इंडी आघाडीच्या नेत्यांना शुभेच्छा देताना चौधरी म्हणाले की, “भारतीय मतदाराचा फायदा पाकिस्तानशी चांगले संबंध असण्यात आहे. भारताने एक पुरोगामी देश म्हणून पुढे जायला हवे आणि त्यासाठीच नरेंद्र मोदी आणि त्यांच्या टोकाच्या विचारसरणीचा पराभव करणे आवश्यक आहे. जो कोणी त्यांचा पराभव करेल, मग ते राहुल गांधी, केजरीवाल किंवा ममता बॅनर्जी असोत, त्यांना शुभेच्छा.” फवाद चौधरी पुढे म्हणाले की, “प्रत्येक पाकिस्तानी पंतप्रधान मोदींचा पराभव व्हावा अशी इच्छा आहे. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांत अतिरेकी कमी झाल्यावरच भारत-पाकिस्तान संबंध पूर्ववत होऊ शकतात. पाकिस्तानी लोकांचे भारताशी वैर नाही.
हे ही वाचा:
‘व्होट जिहाद’साठी तृणमूलने ओबीसींची केली फसवणूक
१९६२ चे चिनी आक्रमण म्हणे ‘कथित’; मणिशंकर यांच्याकडून माफी
हिंदुत्व, ईश्वर समर्थक, माफियाविरोधी प्रतिमेमुळे योगी यांचे स्थान बळकट
नवीन पटनायक यांचा थरथरणारा हात पकडला!
यापूर्वीही फवाद चौधरी यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ ट्वीट केले होते. यानंतर भाजपा नेत्यांनी काँग्रेसवर टीकास्त्र डागले होते. नरेंद्र मोदींनी सभांना संबोधित करताना, काँग्रेस पक्षावर जोरदार हल्ला चढवला होता आणि पाकिस्तानची भाषा बोलल्याचा आरोप देखील केला होय्ता. भारताविरुद्ध दहशतवादाला खतपाणी घालण्यासाठी बदनाम झालेल्या पाकिस्तानशी काँग्रेस मैत्रीचे संदेश पाठवणार असल्याचे त्यांनी सांगितले. पंतप्रधान मोदी म्हणाले की, काँग्रेसचे अनेक नेते त्यासाठी वातावरण तयार करत आहेत. इंडीमधील लोक देशाच्या सुरक्षेसाठी मोठा धोका आहेत. ते काश्मीरमध्ये कलम ३७० पुन्हा लागू करण्याबाबत बोलत आहेत. त्यांना काश्मीरमधील दहशतवाद परत हवा आहे. त्यांना काश्मीर पुन्हा फुटीरतावाद्यांच्या ताब्यात द्यायचे आहे. ते पुन्हा पाकिस्तानला मैत्रीचा संदेश देतील. ते पाकिस्तानला गुलाब पाठवतील, अशी टीका त्यांनी केली होती.







