27 C
Mumbai
Thursday, June 20, 2024
घरक्राईमनामापुणे पोलिसांकडून ससूनच्या डॉ. अजय तावरेच्या घराची झडती

पुणे पोलिसांकडून ससूनच्या डॉ. अजय तावरेच्या घराची झडती

घरातून काही समान घेतले ताब्यात

Google News Follow

Related

पुण्यातील अप्घाताप्रकरणी आता पर्यंत गाडी चालवणारा अल्पवयीन आरोपी, त्याचे वडील, आजोबा, दोन पोलीस कर्मचारी आणि दोन डॉक्टर यांच्यावर कारवाई झाली आहे. या प्रकरणात नव्याने वळणे येत असून पोलिसांकडून या प्रकरणाचा कसून तपास सुरू आहे. पुण्यातील ससून या सरकारी रुग्णालयातील डॉक्टरही हे अपघात प्रकरण दडवण्यात सहभागी असल्याचे समोर आले आहे. अल्पवयीन आरोपीच्या रक्ताचे नमुने बदलल्याचा आरोप ससून रुग्णालयातील डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हाळनोर यांच्यावर आहे. त्यांना अटकही करण्यात आली आहे.

अपघाताच्या वेळी अल्पवयीन आरोपी दारूच्या नशेत होता हे सिद्ध होऊ नये म्हणून डॉक्टरांनी पैसे घेऊन अल्पवयीन आरोपीच्या रक्ताचे नमुने बदलल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पुणे पोलिसांनी कारवाई करत डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हाळनोर यांना अटक केली आहे. अशातच या प्रकरणात अधिकचा तपास करण्यासाठी म्हणून पुणे पोलिसांनी डॉ. अजय तावरेच्या घरी धाड टाकली आहे.

डॉ. अजय तावरेला घेऊन पुणे पोलीस त्याच्या घरी गेले होते. तेव्हा पोलिसांनी तेथे कसून चौकशी केली. तावरेला अटक केल्यानंतर पोलिसांनी त्याची प्राथमिक चौकशी केली होती. त्यानंतर चौकशीत पोलिसांना काही गडबड असल्याचे जाणवताच गीता सोसायटीमधील त्याच्या घराची झडती घेण्यात आली. पोलिसांनी तावरेच्या घरून काही सामानही चौकशीसाठी ताब्यात घेतले असल्याची माहिती आहे.

हे ही वाचा:

श्रद्धा वालकर हत्येप्रकरणी ३००० पानी आरोपपत्र; आफताब विरोधात ठोस पुरावे

नरेंद्र मोदी पुन्हा बसणार ध्यानसाधनेला!

पुण्यात बनावट कागदपत्रांसह वास्तव्य करणाऱ्या पाच बांगलादेशी नागरिकांना अटक

देवाचा अवतार म्हणवून घेणाऱ्या खर्गेंवर सुद्धा भ्रष्टलेख लिहा!

अल्पवयीन आरोपी वेदांत याचे ब्लड सॅम्पलची अदलाबदल केल्याप्रकरणी ससून रुग्णालयाचे डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हळनोर यांना अटक करण्यात आली आहे. अपघातानंतर आरोपीची सकाळच्या वेळेत पोलिसांनी वैद्यकीय तपासणी करून घेतली होती. त्यावेळी त्याच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. ससूनमध्ये त्यावेळी ड्युटीवर असलेले सीएमओ डॉ. श्रीहरी हळनोर आणि डॉ. अजय तावरे यांनी हे ब्लड सॅम्पलच बदलल्याची घटना समोर आली होती. हे ब्लड सॅम्पल त्यांनी कचऱ्याच्या डब्यात फेकले होते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
161,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा