26 C
Mumbai
Thursday, June 20, 2024
घरक्राईमनामापुण्यात बनावट कागदपत्रांसह वास्तव्य करणाऱ्या पाच बांगलादेशी नागरिकांना अटक

पुण्यात बनावट कागदपत्रांसह वास्तव्य करणाऱ्या पाच बांगलादेशी नागरिकांना अटक

दहशतवादी विरोधी पथकाची कारवाई

Google News Follow

Related

पुण्यात दहशतवादी विरोधी पथकाने मोठी कारवाई करत पाच बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे. पिंपरी चिंचवड दहशतवादी विरोधी पथकाने बनावट कागद पत्रांसह पाच बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे. हे पाच जण बनावट कागदपत्रांसह भारतात बेकायदेशीररित्या राहत असल्याचे लक्षात आले होते त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

पुण्यातील भोसरी भागातील शांतीनगर परिसरात दहशतवादी विरोधी पथकाने ही कारवाई केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी शमीम नुरोल राणा, राज उर्फ सम्राट सदन अधिकारी, जलील नरू शेख उर्फ जलील नूर मोहम्मद गोलदार, वसीम अजीज उलहक मंडल उर्फ वसीम अजीऊल हक हिरा, आझाद शमशुल शेख उर्फ अबुल कलाम शमशुद्दिन फकीर या पाच बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे. त्यांना बनावट कागदपत्रे बनवून देणाऱ्या इतर दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे ही वाचा:

‘आप’चा पाय खोलात; मानहानीच्या खटल्यात आतिशी यांना समन्स

विरारच्या अर्नाळा समुद्रात बोट उलटली, एकाचा मृत्यू!

पावसाळ्यातील संकटांना तोंड देण्यास यंत्रणा सज्ज

दिल्लीतील आग; मालकाने परवान्याशिवाय चालवली चक्क तीन रुग्णालये

पकडण्यात आलेले हे आरोपी बांगलादेशी नागरिक असून त्यांच्याकडे कोणताही परवाना किंवा वैध कागदपत्र नसून ते पिंपरी चिंचवड येथे राहत होते. त्यांच्याकडे भारताचे बनावट आधार कार्ड, जन्माचा दाखला आणि शाळा सोडल्याचा दाखला, पासपोर्ट असे सर्व साहित्य आढळून आले आहे. दशहतवाद विरोधी पथकाला याची माहिती मिळताच त्यांनी छापा टाकून पाचही नागरिकांना अटक केली आहे. या कारवाईत आरोपींकडून पोलिसांनी सिम कार्ड, ११ हजार रुपये किंमतीचा मोबाईल, एअरटेल कंपनीचे सिम असे साहित्य जप्त केले आहे. त्यांच्यावर परकीय नागरिक कायदा पारपत्र अधिनियम आणि भारतात प्रवेश करण्याचा नियम यानुसार गुन्हे दाखल केले आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
161,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा