27 C
Mumbai
Thursday, June 20, 2024
घरक्राईमनामा‘आप’चा पाय खोलात; मानहानीच्या खटल्यात आतिशी यांना समन्स

‘आप’चा पाय खोलात; मानहानीच्या खटल्यात आतिशी यांना समन्स

दिल्ली न्यायालयाची कारवाई; चौकशीला हजर राहण्याचे आदेश

Google News Follow

Related

लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरू असतानाचा ‘आप’ पक्षाच्या अडचणी अधिक वाढत असल्याचे चित्र आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यानंतर आता आपच्या नेत्या आणि मंत्री आतिशी यांचा पाय खोलात अडकल्याची माहिती आहे. दिल्ली भाजपाचे मीडिया प्रमुख प्रवीण शंकर कपूर यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्याप्रकरणी दिल्ली न्यायालयाने आप नेत्या आतिशी यांना समन्स बजावले आहे. या समन्सनुसार आतिशीला २९ जून रोजी न्यायालयात हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.

आम आदमी पक्षाच्या नेत्यांना कोट्यवधींच्या रोख रकमेच्या बदल्यात भाजपामध्ये सामील होण्यासाठी भाजपाने संपर्क साधल्याच्या दाव्याबद्दल हे समन्स असून भाजपा नेते प्रवीण शंकर कपूर यांनी मानहानीचा खटला दाखल केला होता. या प्रकरणात दिल्ली न्यायालयाने मंगळवारी दिल्ली सरकारच्या मंत्री आतिशी मार्लेना यांना समन्स बजावले आहे.

मानहानीच्या प्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचेही नाव असून न्यायालयाने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना समन्स बजावलेले नाही, त्यांच्या विरोधात फौजदारी मानहानीचा खटला दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, कपूर यांनी दावा केला की या आरोपांमुळे त्यांची आणि त्यांच्या पक्षाची प्रतिष्ठा खराब झाली आहे. आरोपांची दखल घेत न्यायालयाने आतिशीला आरोपी म्हणून समन्स बजावत त्यांना २९ जून रोजी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

भाजपा नेत्याने ३० एप्रिल रोजी मानहानीचा खटला दाखल केला होता आणि आरोप केला होता की आप नेते यांनी आरोप केल्याप्रमाणे त्यांच्या शिकारीच्या दाव्यांचे पुष्टीकरण करण्यासाठी कोणतीही सामग्री आणि पुरावे सादर करण्यात अयशस्वी ठरले आहेत.

हे ही वाचा:

सुप्रिया सुळे नेता बनण्यात ‘फेल’

गुरुमित राम रहीम सिंगसह चौघांची निर्दोष मुक्तता

तेलंगणाच्या विद्यार्थिनीचा अमेरिकेत अपघातात मृत्यू

केजरीवालांना दणका, जामीन मुदतवाढ अर्जावर सुनावणीस नकार

तसेच याचिकेत केजरीवाल यांनी २७ जानेवारी रोजी पोस्ट केलेल्या एक्स पोस्टचा संदर्भ आहे. त्यांनी २ एप्रिल रोजी आतिशी यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेचाही संदर्भ दिला आहे. आपल्या ट्विटमध्ये केजरीवाल यांनी आरोप केला होता की, भाजपाने ‘आप’च्या सात आमदारांशी संपर्क साधला आहे आणि त्यांची ‘शिकार’ करण्यासाठी २५ कोटी रुपये देऊ केले आहेत. विशेष म्हणजे, कपूर यांनी गेल्या महिन्यात आतिशीला तिच्या भाषणासाठी कायदेशीर नोटीस बजावली होती. आतिशी यांनी म्हटले होते की, त्यांची राजकीय कारकीर्द वाचवण्यासाठी भाजपामध्ये सामील होण्याची ऑफर मिळाली आहे अन्यथा ईडीकडून अटक केली जाईल. मात्र, हे आरोप खोटे असल्याचे भाजपाने म्हटले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
161,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा