28 C
Mumbai
Tuesday, September 17, 2024
घरविशेषपावसाळ्यातील संकटांना तोंड देण्यास यंत्रणा सज्ज

पावसाळ्यातील संकटांना तोंड देण्यास यंत्रणा सज्ज

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती

Google News Follow

Related

आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आज राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाची महत्वपूर्ण बैठक मुंबईत पार पडली. या बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली. प्रामुख्याने मराठवाड्यातील दुष्काळ, अवकाळी पाऊस, अतिवृष्टी आणि गारपीटीचे पंचनामे, मदत आणि येणारा पाऊस या तीन वेगवेगळ्या संकटाना कशा पद्धतीने सामोरे जायचे या प्रमुख मुद्यांवर चर्चा झाल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वार्ताहरांशी बोलताना दिली. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा..

दिल्लीतील आग; मालकाने परवान्याशिवाय चालवली चक्क तीन रुग्णालये

दिल्ली-वाराणसी इंडिगो विमानात बॉम्बची अफवा, प्रवाशांची धावाधाव!

सुप्रिया सुळे नेता बनण्यात ‘फेल’

गुरुमित राम रहीम सिंगसह चौघांची निर्दोष मुक्तता
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, आपत्ती व्यवस्थापन, मान्सून पूर्व घ्यायची काळजी, जाहिरातीचे फलक, दरड कोसळण्याची ठिकाणे, मुंबईतील वस्त्या अशा वेगवेगळ्या विषयांवर चर्चा झाली. पावसाळ्यात ज्या गावांचा संपर्क तुटतो अशा गावांमध्ये औषधे पुरवणे, पुरेसे अन्नधान्य पुरवणे तसेच कर्नाटक, तेलंगणा आणि मध्य प्रदेश मधून येणारे पाणी याबद्दल समन्वय ठेवणे या विषयावर चर्चा झाली. येणारे इशारे लोकांना वेळेत कळाले पाहिजेत यासाठी हवामान विभागाशी चर्चा झाली. रस्त्यातील खड्डे बुजवणे, धोकादायक इमारतीमधील रहिवाशांना इतरत्र हलवणे अशा सर्व विषयांवर चर्चा झाली.

संकटांना तोंड देण्यासाठी राज्यातील सर्व यंत्रणा सज्ज असल्याचे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. बैठकीला सैन्यदल, नेव्ही, एअरफोर्स, कोस्टगार्ड, एनडीआरएफ, एसडीआरएफचे अधिकारी उपस्थित होते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
177,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा