परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी सोमवारी लोकसभेत ऑपरेशन सिंदूरवर बोलताना, पाकिस्तानातील दहशतवादी ठिकाणांवर झालेल्या कारवाईचा उल्लेख करत मोदी सरकारचा निर्धार स्पष्ट केला.
त्यांनी विरोधकांवर टीका करताना विचारले की, “तुमच्यापैकी कुणी कधी कल्पनाही केली होती का की बहावलपूर आणि मुरिदकेसारख्या दहशतवादी ठिकाणांवर हल्ले होतील? आज अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत, पण मी विचारतो – तुमच्यापैकी कोणीतरी हे कधी विचारात घेतलं होतं का?
हे ही वाचा:
‘निसार’साठी नासाला इस्त्रोची गरज का भासली?
कारगिल युद्धातील वीरांच्या यशोगाथेने विद्यार्थी मंत्रमुग्ध
आमीर खान २५ आयपीएस अधिकाऱ्यांना का भेटला? कारण आले समोर!
गुगलने ऑस्ट्रेलियन सरकारला का दिला कारवाईचा इशारा ?
जयशंकर म्हणाले की, “पंतप्रधानांनी देशवासीयांना वचन दिलं होतं की दहशतवादाच्या केंद्रांना लक्ष्य केलं जाईल, आणि ते वचन पाळण्यात आले.”
विरोधकांनी कधी अशा कारवाया केल्याच नाहीत
जयशंकर म्हणाले, “तुमच्या कार्यकाळात कधी असे हल्ले करण्याचा विचारही केला गेला नव्हता. उलट २६/११ नंतर अशा कारवायांना फाटा दिला गेला होता.”
“७ मे रोजी झालेल्या ऑपरेशनमुळे पाकिस्तानला स्पष्ट संदेश मिळाला की भारत दहशतवादाला सहन करणार नाही.”
‘ऑपरेशन सिंदूर’ हे नवे पर्व
जयशंकर यांनी यावेळी चीनच्या संदर्भातही विरोधकांवर निशाणा साधला, “विरोधक आम्हाला चीनबाबत शिकवणी देतात, पण त्यांच्या काळात चीनकडून 2G, 3G तंत्रज्ञान आले. आम्ही मात्र देशी 5G विकसित केलं.”
“आम्ही चीनला ऑलिम्पिकसाठी किंवा गुप्त सौद्यांसाठी गेलो नाही, तर दहशतवाद, व्यापार आणि तणाव कमी करण्यावर भारताची स्पष्ट भूमिका मांडण्यासाठी गेलो.”
जयशंकर यांचे वक्तव्य मोदी सरकारच्या ‘जीरो टॉलरन्स फॉर टेरर’ धोरणाचा पुन्हा एकदा ठाम पुनरुच्चार ठरले.







