26 C
Mumbai
Sunday, March 26, 2023
घरराजकारणआव्हाडांवर गुन्हा दाखल

आव्हाडांवर गुन्हा दाखल

प्राणघातक हल्ला

Google News Follow

Related

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या मुलीला आणि जावयाला जीवे मारण्याचा ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती याच अनुषंगाने जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांनी ठाणे महानगर पालिकेतील अतिक्रमण विभागाचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांच्यावर प्राणघातक हल्ला काल झाला आहे. याप्रकरणी जितेंद्र आव्हाड आणि आणखी सात जणांविरुद्ध नौपाडा पोलीस ठाण्यात कलम ३५३,३०७, ३३२, ५०६(२),१२०(ब ), १४९, १४३, १४८ १४९, या कालमार्तंगत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवाय नगरपालिका अधिनियम ३/२५, ४/२५ याअंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. यामुळेच आता जितेंद्र आव्हाड यांना अटक होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

काय आहे प्रकरण ?
राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कुटुंबियांना मारण्याबाबत असलेली एक ऑडिओ क्लिप व्हायरल काल झाली होती. या ऑडिओ क्लिप मध्ये आव्हाडांच्या मुलीला आणि जावयाला मारण्याबाबतचा उल्लेख केला आहे. त्यामुळे खळबळ उडाली होती. त्यानंतर आव्हाडांच्या समर्थकांनी महेश अहेर यांना मारहाण केली.

महेश  अहेर  यांच्यावर काल हल्ला
काल बुधवारी सायंकाळी सहा वाजून ४५ मिनिटांनी आव्हाड यांचे खाजगी सचिव अभिजित पवार, विक्रम खामकर, हेमंत वाणी यांच्यसह आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांनी ठाणे महानगरपालिकेच्या गेटवरच हा हल्ला केला आहे. ठाणे मनपामध्ये अतिक्रमण विभागाचे सहाय्यक आयुक्त पदावर कार्यरत असलेले महेश अहेर हे आपले कामकाज संपवून घरी निघाले होते. त्यावेळेसच जितेंद्र आव्हाड यांच्या सर्व कार्यकर्त्यांनी हल्ला केला. महेश अहेर आपल्या सुरक्षा रक्षकाबरोबर निघाले असता प्रवेशद्वाराजवळच चार जणांनी त्यांना मारहाण केली. जेव्हा अहेर यांच्या सुरक्षारक्षकाने बचावासाठी धाव घेतली असता , हल्लेखोर कार्यकर्त्यांपैकी एकाने बंदुकीचा धाक दाखवला. नंतर आहेर यांना परत त्यांच्या कार्यालयात नेण्यात आले.

हे ही वाचा:

टीम इंडिया यत्र तत्र सर्वत्र!

संवाद तुटला नात्यांचा खून

बोगस लिपिक भरती.. धनंजय मुंडे यांच्या नावे मंत्रालयात घोटाळा

वरळीत ४२व्या मजल्यावरून कोसळले सिमेंटचे ब्लॉक; दोन जणांचा मृत्यू

दरम्यान मनपाचे वरिष्ठ अधिकारी आणि नौपाडा पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाल्यानंतर पोलिसांच्या संरक्षणामध्ये आहेर यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. त्यानंतर त्यांना ज्युपिटर या ठाण्याच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार चालू असल्याचे सूत्रांकडून कळते. नौपाडा पोलिसानी राष्ट्रवादीच्या कार्यालयात जाऊन त्यांच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. तर जितेंद्र आव्हाड यांच्या मुलीने नताशाने जीवे मारण्याचा उल्लेख असलेल्या ऑडिओ क्लिप मुळे नौपाडा [पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पालिका अधिकारी महेश अहेर यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जवळचे अधिकारी अशी ओळख आहे. त्यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस चे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ब्लॅकमेलिंग करण्याचा आरोप केला होता. तर बाबाजी उर्फ सुभाषसिंग ठाकूर टोळीचा शूटर श्यामकिशोर गरिका पट्टीच्या माध्यमातून महेश अहेर लोकांना करत असतो असा जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.

 

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,880चाहतेआवड दर्शवा
2,035अनुयायीअनुकरण करा
65,400सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा