30 C
Mumbai
Wednesday, May 29, 2024
घरराजकारणकाँग्रेसला अमेठीत दणका; काँग्रेसचे प्रदेश सहसंयोजकांच्या हाती ‘कमळ’

काँग्रेसला अमेठीत दणका; काँग्रेसचे प्रदेश सहसंयोजकांच्या हाती ‘कमळ’

लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला वारंवार धक्के

Google News Follow

Related

लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला वारंवार धक्के मिळत असून आता त्यांना अमेठीतही मोठा दणका बसला आहे. अनेक वरिष्ठ नेते काँग्रेसला सोडचिठ्ठी देत असतानाचं काँग्रेसचे प्रदेश सहसंयोजक विकास अग्रहरी यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. केंद्रीय मंत्री आणि खासदार स्मृती इराणी यांच्या उपस्थितीत विकास यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. विकास अग्रहरी यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.

विकास अग्रहरी यांचा केंद्रीय मंत्री आणि खासदार स्मृती इराणी यांच्या निवासस्थानी भाजपाचे जिल्हाध्यक्ष राम प्रसाद मिश्रा यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश झाला. जगदीशपूर विधानसभेच्या राणीगंज बाजारपेठेतील रहिवासी विकास अग्रहरी हे खंबीर प्रवक्ते म्हणून ओळखले जात होते. तसेच युवा वर्गात मजबूत पकड असलेले विकास अग्रहरी यांची जिल्ह्यात दमदार वक्ता म्हणून ओळख आहे. भाजपाचे जिल्हा प्रवक्ते चंद्रमौली सिंह म्हणाले की, अमेठीतील सर्व सामान्य जनता स्मृती इराणी यांच्यासोबत आहे. गेल्या १० वर्षात स्मृती इराणी यांनी अमेठीशी बांधलेले नाते दिवसेंदिवस अधिक घट्ट होत आहे. यामुळेच लोक आता काँग्रेस सोडून भाजपामध्ये येत आहेत. दरम्यान, भाजपाचे सदस्यत्व स्वीकारताना विकास अग्रहरी म्हणाले की, स्मृती इराणी यांच्या नेतृत्वाखाली अमेठीचा प्रत्येक क्षेत्रात झपाट्याने विकास होत आहे.

हे ही वाचा:

लहान मुलांच्या नेस्ले सेरेलॅकवर संशय!

गुगलने २८ कर्मच्याऱ्याना कामावरून कमी केले

‘मुंबई इंडियन्सबरोबरच गुजरात टायटन्सलाही बुडवले’

सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार प्रकरणात आणखी दोन संशयित अटकेत

भाजपा नेत्या आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्याविरोधात उत्तर प्रदेशातील अमेठी मतदारसंघातून निवडणूक लढवण्याबाबत काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. हायकमांड जो काही निर्णय घेईल, तो मला मान्य असेल, असे राहुल गांधी यांनी सांगितले आहे. दरम्यान,राहुल गांधी यांनी गेल्या लोकसभा निवडणुकीत केरळमधील वायनाड आणि उत्तर प्रदेशातील अमेठीमधून निवडणूक लढवली होती. मात्र अमेठीमधून त्यांचा स्मृती इराणी यांनी पराभव केला होता. तर राहुल गांधी हे वायनाडमधून निवडून आले होते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
157,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा