29 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
घरराजकारण‘धनंजय मुंडेंकडे १००० कोटींची प्रॉपर्टी, पण खर्चाला पैसेही देत नाहीत’

‘धनंजय मुंडेंकडे १००० कोटींची प्रॉपर्टी, पण खर्चाला पैसेही देत नाहीत’

Google News Follow

Related

पत्नी करुणा मुंडे यांनी केला सनसनाटी आरोप

कोल्हापूर उत्तर मतदारसंघातील पोटनिवडणुकीची चर्चा सुरू असताना त्यात ज्या नावाची चर्चा सुरू आहे त्या म्हणजे  करुणा धनंजय मुंडे. समाजकल्याण मंत्री धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा मुंडे यांनी आकार डीजी ९ या वेबपोर्टलला दिलेल्या मुलाखतीत आपल्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडली आहे. या मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी सज्ज असलेल्या करुणा मुंडे म्हणतात की, पती धनंजय मुंडे यांच्याकडून आपल्याला कोणताही खर्च देण्यात येत नाही, आपल्या घराचे भाडेही दिले जात नाही. आपली मुले भुकेली असतात.

त्या म्हणतात की, मी धनंजय मुंडे यांची बायको आहे. २५ वर्षांपासून आम्ही एकत्र आहोत. त्यांचे राजकारण मी जवळून पाहिलेले आहे. १९९८मध्ये लग्न झाले पण गेल्या सहा महिन्यात मंत्री बनल्यानंतर माझ्या पतीचे वर्तन चांगले राहिलेले नाही. पण मी भारतीय संस्कृतीप्रमाणे पत्नी म्हणून ते सहन केले. मात्र माझ्या पतीने मला जेलमध्ये टाकले. काय चालले आहे हे? दिशा सालियन, सुशांत राजपूत, महाराष्ट्रात घडणाऱ्या बलात्काराच्या घटना… जे लोक सत्तेत आहेत तेच बलात्कार करतात. माझे पती असतानाही त्यांनी मला जेलमध्ये टाकले. माझ्या मुलालाही ते पाहून रडू कोसळले होते. करुणा रडत रडत सांगतात की, माझा १७ वर्षांचा मुलगा आहे. त्याच्या डोळ्यातील अश्रु मी विसरू शकत नाही. त्यासाठी मी लढण्याची तयारी केली. माझ्याकडे मसलपॉवर नाही, मनीपॉवर नाही. आहे ती चांगल्या लोकांची साथ. मला जेलमध्ये टाकल्यामुळेच मी राजकारणात आले.

करुणा मुंडे म्हणतात की, मी यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार आणि त्यांची कन्या खासदार सुप्रिया सुळे यांनाही भेटण्याचा प्रयत्न केला, पण प्रतिसाद मिळाला नाही. मी त्यांच्यासमोर झुकायचे नाही ठरविले आणि स्वतः लढण्याचे ठरविले. फेसबुकवरील माझे एक पेज होते. पण ते ससपेन्ड केले गेले. तेव्हा फेसबुक लाइव्ह करत होते. आज मी बाहेर राहून आवाज उठवत आहे तोच आवाज मी विधिमंडळात उठवणार आहे.

हे ही वाचा:

‘देशात लोकशाही कुठे आहे? दबावशाहीचे राजकारण सुरू आहे’

कुठे आहे कायदा सुव्यवस्था? नांदेडमधील बिल्डर संजय बियाणी यांची गोळ्या घालून हत्या

ताजमहालला जेवढे पैसे खर्च झाले, तेवढ्या पैश्यात देशाची गरिबी हटली असती

राजू शेट्टींचा महाविकास आघाडीला रामराम!

 

आपल्या जीवाला धोका असल्याचे सांगताना करुणा म्हणतात की, एक मुलगा काळे कपडे घालून माझा पाठलाग करतो आहे. तो माझ्या गाडीत येऊन बसला होता. माझ्यावर हल्ला करणार होता. पण माझ्यासोबत असलेल्या व्यक्तीने त्याला खाली उतरविले. महाराष्ट्राची जनता माझ्या मागे आहे. इथे हुकुमशाही सुरू आहे. पण मी घाबरणारी नाही. धनंजय मुंडेंनाही घाबरले नाही. मानसिक दबाव आणल्यावर मी सोडून जाईन असे वाटले असेल. पण मी ठरविले की मी एकटीच असले तरी लढणार आहे.

करुणा म्हणाल्या की, धनंजय मुंडे मला कसलाही खर्च देत नाहीत. पतीकडे १००० कोटींची प्रॉपर्टी आहे. माझ्या घराचे पैसे भरले जात नाहीत. मुलं भुकेली आहेत. पण मी रणरागणिसारखे लढणार आहे. यांच्यासमोर झुकणार नाही. झाशीच्या राणीसारखी मी झुंजणार आहे. जनता मला न्याय देईल. कोर्टात मी याचिका दाखल केली आहे. पण पुढे काही होत नाही. सहा मुले आहेत धनंजय मुंडेना. दोन पत्नी आहेत. पण तरीही ते मंत्रिमंडळात आहेत.

करुणा मुंडे यांनी उपोषणाचा निर्णय घेतला आहे. त्या म्हणतात की, २१-२२ एप्रिलपासून मी आझाद मैदानात उपोषणाला बसणार आहे. कारण पती खर्चासाठी पैसे देत नाहीत. असेही आम्ही मरत आहोत. आमरण उपोषण करून आम्ही तिथे प्राण त्यागू.

करुणा यांनी पत्रक काढून त्यातून आपली उद्दिष्टे स्पष्ट केली आहेत. त्या म्हणतात की, उत्तर कोल्हापूरची जनता मला न्याय देईल. मी आमदार बनले तर पाच वर्षे माझ्या मुलांच्या नावावर कोणतीही प्रॉपर्टी घेणार नाही. पेन्शन आणि पगार मी उत्तर कोल्हापूरच्या जनतेला देईन. मी माझ्यासाठी काही ठेवणार नाही.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
147,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा