33 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
घरराजकारणडाव्या विचारसरणीच्या विद्यार्थ्यांना केरळ बोर्डाचे 'मार्क्स'

डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थ्यांना केरळ बोर्डाचे ‘मार्क्स’

Google News Follow

Related

दिल्ली विद्यापीठाच्या किरोडीमल महाविद्यालयाचे प्राध्यापक राकेश पांडे यांच्या विधानामुळे आता दिल्लीमध्ये चांगलीच खळबळ उडालेली आहे. प्रोफेसर पांडे यांनी म्हटले आहे की, केरळ बोर्ड आपल्या विद्यार्थ्यांना डाव्या विचारसरणीचा प्रसार करण्यासाठी मुद्दाम १००% गुण देत आहे. त्यानंतर हे विद्यार्थी दिल्लीत येऊन या विचारसरणीचा प्रसार करतात. प्राध्यापक पांडे यांच्या या विधानानंतर दिल्ली विद्यापीठातील शिक्षक आणि विद्यार्थ्यांमधील गटबाजी चव्हाट्यावर आलेली आहे.

राकेश पांडे गेल्या ३० वर्षांपासून दिल्ली विद्यापीठात भौतिकशास्त्र शिकवत आहेत आणि सध्या भौतिकशास्त्र विभागाचे शिक्षक प्रभारी आहेत. प्रोफेसर पांडे यांच्या म्हणण्यानुसार, एका सुनियोजित षड्यंत्राखाली केरळ बोर्ड आपल्या मुलांना १००% गुण देत आहे. जेणेकरून केरळची मुले दिल्ली विद्यापीठात प्रवेश घेऊन डाव्या विचारसरणीचा प्रसार करू शकतील.

जेएनयूमध्ये आता या विचारांचा प्रभाव खूपच कमी झालेला आहे. त्यामुळे केरळमधील शिक्षम मंडळ डावी विचारसरणी पसरवण्यासाठी आता दिल्लीकडे वळले आहेत. मुख्य म्हणजे ही मुले, दिल्लीत आल्यानंतर महाविद्यालये तसेच वसतिगृहे या सर्वच ठिकाणी या विचारसरणीचा प्रसार करण्याच्या इराद्याने दिल्लीत येतात असे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळेच दिल्लीतील शिक्षण क्षेत्रात एक खळबळ उडालेली आहे. यामध्ये शिक्षकांचा एक ग्रुप हे बरोबर असल्याचे म्हणत आहे. तर काहीजणांना मात्र हे अजिबात पटलेले नाही.

काँग्रेस विद्यार्थी संघटनेने प्रोफेसर पांडे यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. तसेच त्यांना पदावरून हटवावे अशी मागणी आता केलेली आहे. एनएसयूआयचे सचिव वरुण चौधरी म्हणतात की या लोकांनी आधी ‘लव्ह जिहाद’ म्हणत संपूर्ण देशाचे विभाजन करण्याचा प्रयत्न केला आणि आता ते ‘मार्क जिहाद’ म्हणत विद्यार्थ्यांमध्ये फूट पाडत आहेत. अभाविपने मात्र पांडे यांना समर्थन दिलेले आहे.

 

हे ही वाचा:

ठाकरे सरकार विरोधात शेतकऱ्यांचा अन्नत्याग

एनसीबी संचालक वानखेडे यांच्या मागावर गुप्तहेर

वाहतूक नियम मोडणाऱ्यांना लावणार जबरदस्त ‘ब्रेक’

मेहबुबांची मुफ्तीफळे; म्हणे आर्यन मुस्लिम असल्याने होतेय कारवाई

 

दिल्ली विद्यापीठाच्या पहिल्या कट-ऑफ यादीमध्ये सीबीएसई बोर्डाच्या मुलांना जास्तीत जास्त प्रवेश मिळाले आहेत. त्यानंतर केरळ बोर्ड दुसऱ्या क्रमांकावर आहे. सीबीएसई बोर्डाचे ३१, ७२, केरळ बोर्डाचे २, ३६५ विद्यार्थी, हरियाणा बोर्डाचे १५४० आणि राजस्थान बोर्डाचे १३०१ एवढ्या विद्यार्थ्यांना दिल्ली विद्यापीठातील महाविद्यालयात प्रवेश मिळाला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
147,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा