28 C
Mumbai
Monday, June 27, 2022
घरराजकारणकेतकी चितळेला न्यायालयीन कोठडी, गोरेगाव पोलिसांकडे ताबा

केतकी चितळेला न्यायालयीन कोठडी, गोरेगाव पोलिसांकडे ताबा

Related

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल अभिनेत्री केतकी चितळेला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. आज, १८ मे रोजी तिची पोलीस कोठडीची मुदत संपल्यामुळे तिला ठाणे सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी तिला न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दरम्यान, सत्र न्यायालयात केतकीच्या सुनावणीवेळी गोरेगाव पोलीस देखील तिचा ताबा घेण्यासाठी दाखल झाले होते. यावेळी गोरेगाव पोलिसांनी केतकीच्या कोठडीची मागणी केली होती. न्यायालयाकडून केतकीची कोठडी गोरेगाव पोलिसांना देण्यात आली असून गोरेगाव पोलिस केतकीचा ताबा गुरुवार, १९ मे रोजी घेणार आहेत.

केतकी चितळेला शनिवार, १४ मे रोजी नवी मुंबई पोलिसांनी अटक केले होते. यानंतर तिला १८ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. मागील सुनावणीवेळी केतकीने स्वतः न्यायालयात युक्तिवाद केला होता. पोलीस कोठडीची मुदत आज संपल्यानंतर तिला ठाणे सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते. ठाणे गुन्हे शाखेने पाच दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाकडे मागितली होती. मात्र न्यायालयाने केतकीला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती.

केतकी चितळेने फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमुळे ती मोठ्या वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. ज्या दिवशी तिने पोस्ट केली त्या दिवशी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. केतकीवर शाईफेक आणि अंडीफेक करण्यात आली होती.

हे ही वाचा:

मध्य प्रदेशला जे जमले ते महाराष्ट्राला जमले नाही

महाराष्ट्र सरकारची निती ओबीसी विरोधी, सरकारने ओबीसी आरक्षणाचा मुडदा पाडला

मध्य प्रदेशला जे जमले ते महाराष्ट्राला जमले नाही

रशियाचा मोठा विजय, मारियुपोलवर ताबा

दरम्यान, केतकीने न्यायालयात युक्तीवाद करताना म्हटलं होते की, ती पोस्ट माझी नाही. ती मी सोशल मीडियातून कॉपी करुन पोस्ट केली होती. सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त करणे गुन्हा आहे का? असा सवाल देखील तिने केला होता. केतकीने सुनावणीदरम्यान वकील घेतला नाही, तीने स्वतः न्यायालयात युक्तिवाद केला. तिने हेही स्पष्ट केले की, मी या पोस्ट मी डिलीट करणार नाही. माझा तो अधिकार आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,937चाहतेआवड दर्शवा
1,922अनुयायीअनुकरण करा
11,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा