28 C
Mumbai
Monday, June 27, 2022
घरराजकारण'या आगीत परबांची कागदपत्रं जाळण्यात आली'

‘या आगीत परबांची कागदपत्रं जाळण्यात आली’

Related

दापोली पोलीस ठाण्याला लागलेल्या आगीवरून भारतीय जनता पार्टीचे नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेना नेते अनिल परब यांच्यावर निशाणा साधला आहे. सोमय्यांनी, या पोलीस ठाण्यात अनिल परब यांच्या बेकायदेशीर रिसॉर्ट्सची कागदपत्रे होते, याची काळजी वाटते असे ट्विट केले आहे.

शनिवार, १४ मे रोजी दापोली पोलीस ठाण्याला आग लागली होती. सकाळी साडेसहाच्या सुमारास अचानक पोलीस ठाण्याला आग लागली होती. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. परंतु, या आगीत अनेक रेकार्ड जळल्याची माहिती समोर आली आहे. ह्याच माहितीचा पाठपुरावा करत किरीट सोमय्यांनी आरोप केला आहे. या आगीत परबांची कागदपत्रं जाळण्यात आली, असा गंभीर आरोप सोमय्यांनी केला आहे.

हे ही वाचा:

मोदी सरकारचा मोठा निर्णय; गव्हाच्या निर्यातीवरील बंदीमध्ये शिथिलता

मंदिर पाडून ज्ञानवापी मशीद उभारल्याचा सलमान खुर्शीद यांचा दावा

पंतप्रधान मोदींच्या कान्स चित्रपट महोत्सवाला शुभेच्छा

श्रीलंकेचे नवे पंतप्रधान विमान कंपनी विकणार, वेतन देण्यासाठी पैसे छापणार

किरीट सोमय्या यांनी दापोली पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांना याबाबत पत्र देखील लिहिले आहे. या पत्रात त्यांनी लिहले आहे की, “दापोली पोलीस ठाणे येथे काही दिवसांपूर्वी आग लागली. या आगीत मी दिलेली तक्रार, अनधिकृत साई रिसॉर्ट आणि सी कौंच रिसॉर्ट, अनिल परब/सदानंद कदम या संबंधीचे केंद्र सरकार, राज्य सराकर, जिल्हाधिकारी रत्नागिरी यांनी केलेली कार्यवाही, पोलिसांसोबत केलेला पत्रव्यवहार सुरक्षित आहे का? या संबंधीचा मुख्य तक्रारदार मी असल्यामुळे मला याची अधिक चिंता आहे, असे सोमय्या यांनी दापोली पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,937चाहतेआवड दर्शवा
1,922अनुयायीअनुकरण करा
11,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा