28 C
Mumbai
Wednesday, February 4, 2026
घरराजकारण'४८ तासांत उद्धव, संजय राऊत माफी मागा...'

‘४८ तासांत उद्धव, संजय राऊत माफी मागा…’

Google News Follow

Related

भारतीय जनता पार्टीचे नेते किरीट सोमय्या यांच्यावर कथित विक्रांत घोटाळ्याचा आरोप आहे. यावरून किरीट सौमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी विक्रांत घोटाळ्या प्रकरणी बदनामी केल्याचा आरोप करत मानहानी खटला दाखल करण्याबाबत नोटीस दिली आहे. याप्रकरणी येत्या ४८ तासात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी माफी मागितली नाही तर, कायदेशीर कारवाई करणार असल्याचा इशारा सोमय्यांनी दिला आहे.

सोमय्या म्हणाले, “उद्धव ठाकरे आणि संजय राऊत ‘महाडरपोक’ लोक आहेत. मागील ३ महिन्यात त्यांनी १२ वेळा स्टंटबाजी केली. ७ हजार ५०० कोटी अमित शहांना दिले, त्यामध्ये ४५० कोटी जुहूची जमीन असल्याचे आरोप केले. आरोप केले मात्र एकही आरोपावर त्यांना पुरावे सादर करता आलेले नाहीत. माझ्यावर उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांच्यामार्फत ५७ कोटी रुपयांच्या विक्रांत घोटाळ्याचा आरोप केला.”

पुढे ते म्हणाले, “आता मी संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंना आव्हान देतो. मी मुंबई पोलिसांना सांगणार आहे की, त्यांनी संजय राऊत यांना बोलवून माझ्यावर केलेल्या ५७ कोटी घोटाळ्याची कागदपत्रे त्यांच्याकडून घ्यावीत. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत हे भित्रे नेते आहेत. ते दुसऱ्यांना तक्रार करायला लावतात. उद्धव ठाकरे यांनी संजय राऊतांमार्फत माझ्यावर आरोप केले. किरीट सोमय्या आणि नील सोमय्याला जेलमध्ये टाकायला निघाले होते. माझ्यावर ५७ कोटी विक्रांत घोटाळ्याचा आरोप केला, पण संजय राऊत यांनी ५७ पैशांचा पुरावा दिला नाही. ते त्यांचा भ्रष्टाचार उघड होतोय आणि त्यांची संपत्ती जप्त होणार म्हणून घाबरून काहीही आरोप करत आहेत.”

हे ही वाचा:

वीजसंकटावर गृहमंत्री अमित शहा उचलणार पाऊल

बर्लिनमध्ये लहान मुलीच्या चित्राचे केले पंतप्रधान मोदींनी कौतुक

‘शिवसेना नेत्यांना बुद्धिदोष झाला आहे’ आशीष शेलारांची टीका

‘उद्धव ठाकरे भगवे उतरवून हिरवे झालेत’

नील सोमय्यांच्या कंपनीत ४ बिल्डरने मनी लाँड्रिंग केली, असा आरोप राऊत यांनी केला होता. त्यामुळेच माझ्या पत्नीने त्यांना जाणीवपूर्वक नोटीस दिली. खोट बोलून विरोधी पक्षातील नेत्यांना जेलमध्ये टाकणाऱ्यांचा पर्दाफाश केला पाहिजे. त्यांनी पुढील ४८ तासात माफी मागितली नाही तर आम्ही त्यांच्यावर बदनामी, मानहानीचा दावा दाखल करणार आहोत. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना त्यांची जागा दाखवून देणार आहे,” असंही किरीट सोमय्या यांनी सांगितले.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
290,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा