29 C
Mumbai
Friday, February 26, 2021
घर राजकारण लडाखच्या खासदाराने उडवली राहुल गांधींची खिल्ली! म्हणाले...

लडाखच्या खासदाराने उडवली राहुल गांधींची खिल्ली! म्हणाले…

Related

लडाखचे भारतीय जनता पार्टीचे खासदार जामयांग नामग्याल हे आपल्या खुमासदार शैलीसाठी प्रसिद्ध आहेत. ते अनेकदा या शैलीत ट्विट करत आपल्या विरोधकांवर निशाणा साधत असतात. अश्याच एका नव्या ट्विटमध्ये नामग्याल यांनी राहुल गांधींची फिरकी घेतली आहे.

जामयांग नामग्याल यांनी राहुल गांधींचा एक फोटो ट्विट केला आहे. या फोटोत राहुल गांधी धावताना दिसत आहेत. “गेल्या आठवड्यात राहुल गांधी पुदुचेरीला गेले होते. पुदुचेरी निपटून गेले. चला आता धावत महाराष्ट्रात जाऊ.” असे नामग्याल यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. याला पुदुचेरी मधल्या राजकीय नाट्याचा संदर्भ आहे.

काँग्रसचे आमदार लक्ष्मीनारायण आणि डीएमकेचे आमदार वेंकटेशन यांनी रविवारी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला. यापूर्वीच काँग्रेसच्या चार आमदारांनी पक्षाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे पुदुचेरी विधानसभेत काठावरचे बहुमत असणारे काँग्रेसचे सरकार धोक्यात आले होते. या दोन आमदारांच्या राजीनाम्यामुळे ३३ सदस्यीय विधानसभेत काँग्रेस-डीएमके आघाडीच्या आमदारांची संख्या घटून ११ झाली. त्यानांतर बहुमत चाचणीमध्ये मुख्यमंत्री व्ही. नारायणसामी यांना बहुमत सिद्ध करण्यात अपयश आले. त्यानंतर त्यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. यावरूनच काँग्रेसला टोला लागवताना त्यांनी महाराष्ट्रा कडे धाव घ्यायचा सल्ला राहुल गांधींना दिला आहे. सध्या महाराष्ट्रात काँग्रेस पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत सत्ता राबवत असून सर्वात मोठा पक्ष असलेला भाजपा विरोधी पक्षात आहे.

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,260चाहतेआवड दर्शवा
526अनुयायीअनुकरण करा
673सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा