पोहरादेवी गडावरील महंतासह कुटुंबातील चौघांना कोविड-१९ ची लागण झाली आहे. महाराष्ट्र कोविड-१९ च्या रुग्णांची संख्या वाढत असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले मुख्यमंत्र्यांनी व्हिडिओ मधून जनतेशी संवाद साधत असताना त्यांनी पुन्हा लॉकडाऊन हवा की नको हे विचारले होते. जे मास्क वापरत आहेत, सोशल डिस्टंसिंग पाळत आहेत, त्यांना लॉकडाऊन नको आणि हे या गोष्टी करत नाहीत त्यांना लॉकडाऊन हवा आहे असे मी समजीन, असेही ते म्हणाले होते. परंतु त्यांचेच मंत्री संजय राठोडने शक्ती प्रदर्शन करण्याच्या नादात हे सगळे नियम धाब्यावर बसवून सोशल डिस्टंसिंगला केराची टोपली दाखवली होती. शिवाय त्यांच्या अनेक समर्थकांनी मास्कही वापरला नव्हता. परिणामतः आता पोहोरादेवी मंदिरातील महंतासह चौघांना कोविड-१९ ची लागण झालेली आहे.
हे ही वाचा:
पूजा चव्हाण प्रकरणात नाव आल्यापासून गायब असलेले महाराष्ट्राचे वनमंत्री संजय राठोड हे मंगळवारी सकाळी प्रकट झाले. बंजारा समाजाचे आराध्यदैवत असणाऱ्या पोहरादेवीचे दर्शन घेण्यासाठी संजय राठोड वाशिम जिल्ह्यात पोहोचला. यावेळी राठोडच्या समर्थकांकडून कोरोनाचे सर्व नियम धाब्यावर बसवून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले. राठोड आपल्या कुटुंबियां समवेत अनेक गाड्यांचा ताफा घेऊन पोहरादेवीच्या दर्शनासाठी गेला. पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात असून देखील हजारो कार्यकर्त्यांनी रठोडच्या समर्थनार्थ गर्दी केली. गर्दी अनावर झाल्याने पोलिसांना लाठीचार्जही करावा लागला. पोहरादेवीचे दर्शन घेऊन झाल्यानंतर राठोडने माध्यमांशी संवाद साधला आणि पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात आपले मौन सोडले.







