29 C
Mumbai
Thursday, May 9, 2024
घरराजकारणफडणवीसांचा एक फोन आणि महाराष्ट्रासाठी ऑक्सिजन एक्स्प्रेस

फडणवीसांचा एक फोन आणि महाराष्ट्रासाठी ऑक्सिजन एक्स्प्रेस

Google News Follow

Related

महाराष्ट्रात कोरोनाने थैमान घातले असून रुग्णांना मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजन साठ्याची आवश्यकता भासत आहे. अशा परिस्थितीत महाराष्ट्राला लवकरात लवकर ऑक्सिजन पुरवठा व्हावा यासाठी ऑक्सिजन एक्सप्रेसचा अवलंब होत आहे. या संबंधीचाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून यात महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे फोनवरून अशाप्रकारे ट्रेनच्या माध्यमातून ऑक्सिजन पुरवठा करण्यात येणे शक्य आहे का? अशी चर्चा केंद्रीय मंत्र्यांशी करताना दिसत आहेत.

महाराष्ट्रात कोरोनाचा हाहाकार माजला असताना यात राज्याची जनता होरपळून निघत आहे. कुठे बेड्सची कमतरता आहे, तर कुठे रेमडेसिवीर मिळताना मारामार होत आहे. राज्यात अनेक ठिकाणी ऑक्सिजनचाही तुटवडा जाणवत आहे. अशा वेळी राज्याची ऑक्सिजनची गरज पूर्ण करण्यासाठी भारतीय रेल्वेतर्फे ऑक्सिजन एक्सप्रेसचा पर्याय अवलंबला जात आहे. राज्याला आवश्यक ऑक्सिजनचा पुरवठा जलदगतीने व्हावा यासाठी या एक्सप्रेसचा अभिनव पर्याय वापरला जात आहे.

हे ही वाचा:

अरविंद केजरीवाल विलगीकरणात

दादरचे भाजी मार्केट बंद होणार?

नावात ‘ऑक्सिजन’ असल्याचा असाही फायदा

निलेश राणेंची उद्विग्न प्रतिक्रिया, म्हणाले मंत्राना गोळ्या घातल्या पाहिजेत

या एक्सप्रेसची कल्पना महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची असल्याचे म्हटले जात आहे. त्यासंबंधीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये देवेंद्र फडणवीस हे एका हॉस्पिटलमधून भारताचे रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्याशी संभाषण करताना दिसत आहेत. रस्ते मार्गाने ऑक्सिजनचे टँकर्स महाराष्ट्रात येताना त्यांना जास्त वेळ लागतो तेव्हा हे टँकर्स रेल्वेवर चढवून महाराष्ट्रात आणता येऊ शकतील का? जेणेकरून ते अधिक जलद गतीने महाराष्ट्रात पोहोचतील. या संबंधीची विचारणा फडणवीस करताना दिसत आहेत. फडणवीस यांच्या या फोन नंतरच राज्यात रेल्वेद्वारे ऑक्सिजन पुरवठा होत आहे.

ऑक्सिजनची विविध राज्यांना असलेली गरज भागविण्यासाठी ऑक्सिजन एक्स्प्रेसचा नामी पर्याय केंद्र सरकारने दिला आहे. मालगाडीवरून ऑक्सिजनचे टँकर देशातील विविध राज्यांत पोहोचविण्याचा धोरणात्मक निर्णय मोदी सरकारने घेतला असून ही ऑक्सिजन एक्स्प्रेस आजपासून राज्याराज्यांत हा पुरवठा वेगाने करणार आहे. या एक्स्प्रेसला कुठलाही अडथळा येऊ नये म्हणून ग्रीन कॉरिडॉरही तयार करण्यात आला आहे. त्यामुळे राज्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. प्रथमच अशा पद्धतीची वेगवान सुविधा केंद्राने रेल्वेच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली आहे. विशेष म्हणजे निर्यातीसाठी वापरले जाणारे क्रायोजेनिक टँकर्स आता ऑक्सिजन वाहण्यासाठी वापरण्याचा निर्णय घेऊन यासंदर्भातील गांभीर्यही मोदी सरकारने दाखविले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
151,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा