29 C
Mumbai
Wednesday, May 8, 2024
घरराजकारणघोषणा सम्राट सरकारमुळे महाराष्ट्रात लसीकरणाचा फज्जा

घोषणा सम्राट सरकारमुळे महाराष्ट्रात लसीकरणाचा फज्जा

Google News Follow

Related

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी लसीकरणाच्या मुद्द्यावरून ठाकरे सरकारला धारेवर धरले आहे. तर शिवसेना शासित मुंबई महापालिकेच्या कारभारावरही त्यांनी निशाणा साधला आहे. ‘घोषणा सम्राट सरकारमुळे महाराष्ट्रात लसीकरणाचा फज्जा उडाला आहे’ अशी जहाल टीका दरेकर यांनी केली आहे.

गुरुवार, २ जून रोजी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी ठाकरे सरकारवर चांगलीच तोफ डागली आहे. ट्विटरच्या माध्यमातून लसीकरणाचा मुद्दा उचलत दरेकर यांनी सरकारची पिसे काढली आहेत. दरेकर आपल्या ट्विटमध्ये असे म्हणतात. “ग्लोबल टेंडरचा बार फुसका ठरला. दीड महिन्यापूर्वी परवानगी देऊनही महाराष्ट्र सरकार व मुंबई महानगरपालिका लस खरेदी करू शकली नाही. केंद्र सरकारने सर्व लसी मोफत पुरवल्या. घोषणा सम्राट सरकारने नियोजन न करता मोफत लसीकरणाची घोषणा केल्यामुळे महाराष्ट्रात लसीकरणाचा फज्जा उडाला.” असे टीकास्त्र दरेकर यांनी डागले आहे.

हे ही वाचा:

परदेशी लशींचा भारतात येण्याचा मार्ग मोकळा

भेट लागी जिव्हारी

बारा आमदारांचे प्रकरण विचाराधीन, मुख्यमंत्री कार्यालयाची माहिती

आता एकनाथ खडसे शरद पवारांच्या भेटीला

ठाकरे सरकारच्या नेतृत्वात महाराष्ट्रात कोविड लसीकरणाचा सावळा गोंधळ सुरू असलेला दिसत आहे. महाराष्ट्र सरकारला जागतिक निविदा काढण्याची परवानगी दिली असूनही सरकारने निविदा काढलेली नाही. उलट हा विषयही केंद्रावरच ढकलण्याचा प्रयत्न केला. मुंबई महापालिकेने जागतिक निविदा काढली असली तरीही त्याला म्हणावा तास प्रतिसाद मिळालेला दिसत नाही. उलट यातही घोटाळा झाला असल्याचा आरोप केला जात आहे. लसीची कमतरता असल्याचे कारण पुढे करत सरकारने सर्व सरकारी लसीकरण केंद्रांवरचे १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण हे पूर्णपणे बंद करण्यात आले आहे. तरीही काही प्रसिद्ध व्यक्तींना नियमबाह्य लसीकरण केले जात असल्याची प्रकरणे समोर येताना दिसत आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
150,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा