32 C
Mumbai
Friday, April 19, 2024
घरराजकारणशरद पवार अध्यक्ष असलेली महाराष्ट्र कुस्तीगीर संघटना बरखास्त

शरद पवार अध्यक्ष असलेली महाराष्ट्र कुस्तीगीर संघटना बरखास्त

Google News Follow

Related

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना मोठा धक्का बसला आहे. शरद पवार अध्यक्ष असलेली महाराष्ट्र कुस्तीगीर संघटना बरखास्त करण्यात आली आहे. भारतीय कुस्ती संघटनेकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. दिल्लीत झालेल्या संघटनेच्या वार्षिक सभेत हा निर्णय घेण्यात असून आगामी काही दिवसात हंगामी समितीची निवड होईल, अशी माहिती समोर आली आहे. जिल्हा संघटना आणि काही पैलवानांकडून करण्यात आलेल्या तक्रारींमुळे ही कारवाई झाल्याची माहिती आहे.

महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद ही भारतीय कुस्ती संघटनेकडून बरखास्त करण्यात आली आहे. दिल्लीत झालेल्या संघटनेच्या वार्षिक सभेत हा निर्णय घेण्यात आला आहे. भाजपाचे खासदार बृजभुषण सिंह हे भारतीय कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष आहेत. तर विनोद तोमर हे सचिव आहेत. शरद पवार हे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष आहेत तर बाबासाहेब लांडगे हे ४० वर्षांहून अधिक काळ सचिव आहेत.

हे ही वाचा:

बंडानंतर शिवसैनिकांना प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश

‘रेडिसन ब्लू’ हॉटेलचं बिल शिंदे आणि समर्थक आमदारांनी केलं चुकतं  

धर्मवीर सुपरहिट झाला! किती कमावले?

दहा तासांनी राऊत यांची ईडी कार्यालयातून सुटका

बाबासाहेब लांडगे यांच्या मनमानी कारभाराविरुद्ध काही दिवसांपुर्वी पुण्यात पैलवानांनी आंदोलन देखील केलं होतं. त्यानंतर भारतीय कुस्ती महासंघाकडे तक्रार देखील करण्यात आली होती. याच बरोबर गेल्या काही वर्षांपासून महासंघाने राज्य परिषदेला १५ आणि २३ वर्षाखालील राष्ट्रीय कुस्ती स्पर्धांचे आयोजन करण्यास सांगितले होते. पण ही विनंती परिषदने फेटाळली होती. त्यामुळे देखील महासंघाची नाराजी होती. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. महाराष्ट्रात महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे आयोजन महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेतर्फे करण्यात येते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
147,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा