31 C
Mumbai
Thursday, December 5, 2024
घरराजकारणमहाराष्ट्रात त्सुनामी; महायुतीने केला मविआचा सुपडा साफ, भाजपाचे ऐतिहासिक यश

महाराष्ट्रात त्सुनामी; महायुतीने केला मविआचा सुपडा साफ, भाजपाचे ऐतिहासिक यश

महाराष्ट्रातील अनेक दिग्गजांना या निवडणुकीत पराभवाची चव चाखावी लागली

Google News Follow

Related

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचे निकाल शनिवारी आले आणि काही तासांत वादळाने जसा पालापाचोळा उडवून टाकावा तशी महाविकास आघाडीची अवस्था झाली. भारतीय जनता पार्टी, एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस यांनी महाविकास आघाडीला चारी मुंड्या चीत करत २३३ जागांवर दणदणीत विजय मिळवला आणि महाराष्ट्रातील सरकार स्थापनेवर शिक्कामोर्तब केले. भाजपाने या निकालात प्रचंड मोठी मुसंडी मारत आतापर्यंतच्या महाराष्ट्रातील विधानसभेच्या इतिहासातील सर्वोच्च कामगिरी केली. १३२ जागांवर भाजपा विजयी ठरला. उद्धव ठाकरेंना नाकारून वेगळे झालेले एकनाथ शिंदे आणि शरद पवारांना झुगारणारे अजित पवार यांनीही दमदार कामगिरी केली.

एकनाथ शिंदेंनी ५७ जागांवर विजय मिळवत शिवसेना ही आपलीच आहे यावर मोहोर उमटविली तर अजित पवारांनी लोकसभा निवडणुकीतील निराशा पूर्णपणे झटकून आपण राष्ट्रवादीचे नेतृत्व करण्यास सक्षम आहोत याची पोचपावती दिली. त्यांनी ४१ जागांवर विजय मिळविला. काँग्रेसला गेल्यावेळेस ४४ जागा मिळाल्या होत्या यावेळी त्यांना १६ जागांवर समाधान मानावे लागले. शरद पवारांना तब्बल ४४ जागांचा फटका सहन करावा लागला. त्यांच्या केवळ १० जागाच आल्या. उद्धव ठाकरे गटाच्या खात्यात २० जागा आल्या. पण एकनाथ शिंदे यांनी २०१९ची पुनरावृत्ती करताना आपल्या पक्षाला ५७ जागा जिंकून दिल्या.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मात्र खातेही उघडता आले नाही. त्यांना एकही जागा जिंकता आली नाही. अमित ठाकरे, बाळा नांदगावकर, संदीप देशपांडे यांचा दारुण पराभव झाला. महाराष्ट्रातील सगळ्या सहा विभागात महायुतीने महाविकास आघाडीला धूळ चारली. विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि मुंबई या क्षेत्रात महायुतीने वादळी कामगिरी केली. हा विजय नेमका कशामुळे मिळाला याविषयी मग विरोधकांनी आपापले अंदाज बांधत हा रडीचा डाव असल्याची प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली. ईव्हीएममध्ये दोष असल्याचे आरोपही विरोधकांनी केले.

हे ही वाचा:

जनतेनेच केले चंगू-मंगूंच्या मूळव्याधीचे ऑपरेशन

“एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवारांवर जनतेचा विश्वास बसलाय”

उद्धव ठाकरेंना २० देखील जागा गाठत्या आल्या नाहीत, राज्याला तोंड दाखवू नये!

राज्यात महायुतीला लँडस्लाईड व्हिक्टरी!

महाराष्ट्रात अनेक दिग्गजांनी मोठे विजय नोंदवत महायुतीच्या या विजयाला झळाळी आणली. नागपूर पश्चिममधून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कोपरी पाचपाखाडीतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, बारामतीतून अजित पवार हे प्रमुख नेते दमदार विजय मिळवत आपापल्या पक्षांचे नेतृत्व करत होते. मुंबईत उपनगरात आशीष शेलार (बांद्रा पश्चिम), अतुल भातखळकर (कांदिवली पूर्व), योगेश सागर, संजय उपाध्याय, अमित साटम, मनिषा चौधरी, कोकणात नितेश राणे, निलेश राणे, नाशिकमध्ये येवल्यात छगन भुजबळ, देवळालीत सरोज आहिरे, नालासोपाऱ्यातून राजन नाईक, ऐरोलीतून गणेश नाईक, मुलुंडमधून मिहीर कोटेचा, जोगेश्वरी पूर्वेतून मनीषा वायकर, विलेपार्ल्यातून पराग अळवणी, चांदिवलीत दिलीप लांडे, वडाळ्यातून कालिदास कोळंबकर, मलबार हिलमधून मंगलप्रभात लोढा, कुलाब्यातून राहुल नार्वेकर, श्रीवर्धनमधून आदिती तटकरे, महाडमधून भरत गोगावले, दौंडमध्ये राहुल कुल, इंदापूरमध्ये दत्ता भरणे, पुरंदरमध्ये विजय शिवतारे, कसबा पेठमधून हेमंत रासने, शिर्डीतून राधाकृष्ण विखे, गेवराईत सुहास कांदे, परळीत धनंजय मुंडे, लातूर ग्रामीणमधून रमेश कराड, कराड दक्षिणमधून अतुल भोसले, साताऱ्यात शिवेंद्रराजे भोसले, सावंतवाडीत दीपक केसरकर यांनी विजयश्री खेचून आणली.

महाराष्ट्रातील अनेक दिग्गजांना या निवडणुकीत पराभवाची चव चाखावी लागली. त्यात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, संजय काका पाटील, इम्तियाज जलील, बच्चू कडू, सदा सरवणकर, अमित ठाकरे, राजन विचारे, समरजितसिंह घाटगे, राम शिंदे, यशोमती ठाकूर, राजेश टोपे, हर्षवर्धन पाटील यांचा त्यात समावेश होता. एमआयएमने १६ उमेदवार दिले पण हिंदुत्वाविरोधात गरळ ओकणाऱ्या ओवैसी यांच्या पक्षातील १५ उमेदवार पराभूत झाले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
207,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा