25 C
Mumbai
Sunday, December 15, 2024
घरविशेषविनोद तावडेंवर आरोप करणाऱ्या हिंतेंद्र ठाकूर, क्षितीज ठाकूरचा सुपडा साफ!

विनोद तावडेंवर आरोप करणाऱ्या हिंतेंद्र ठाकूर, क्षितीज ठाकूरचा सुपडा साफ!

वसई, नालासोपाऱ्यात भाजपा तर पालघरमध्ये शिवसेना शिंदेंचा विजय

Google News Follow

Related

भाजपचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडेंवर निवडणुकीमध्ये पैसा वाटप केल्याचा आरोप करणाऱ्या हिंतेंद्र ठाकूर, क्षितीज ठाकूरचा पराभव झाला आहे. वसई, नालासोपारामध्ये भाजपा आणि पालघरमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवाराचा विजय झाला आहे.

मतदानाच्या एक दिवसाआधी पालघरमध्ये विनोद तावडेंच्या बैठकीदरम्यान हिंतेंद्र ठाकूर, क्षितीज ठाकूर या पिता पुत्रांनी हॉटेलमध्ये शिरकाव करत विनोद तावडेंवर पैसे वाटप केल्याचा आरोप केला होता. याचे व्हिडीओ देखील शेअर करत त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला गेला. विशेष म्हणजे, राष्ट्रीय स्तरावरचा नेता पैसे वाटण्यासाठी येवू शकतो का? हा प्रश्न उपस्थित झाला होता. मात्र, हितेंद्र ठाकूर यांनी आपला आरोप कायम ठेवला. मतदानाच्या एक दिवसा अगोदर अशा घटनेमुळे महायुतीला पालघर, वसई, नालासोपारामध्ये फटका बसेल अशी चर्चा होती. मात्र, मतदारांनी महायुतीच्या उमेदवारांवर विश्वास ठेवून मते दिले आणि ते विजयी झाले.

वसईमध्ये भाजपच्या स्नेहा दुबे पंडित यांचा विजय झाला आहे त्यांनी बहुजन विकास आघाडीच्या हितेंद्र ठाकूर यांचा पराभव केला. स्नेहा दुबे यांना ७५५५३ तर हितेंद्र ठाकूर यांना ७४४०० इतकी मते पडली. नालासोपाऱ्यामध्ये भाजपचे राजन नाईक यांनी बहुजन विकास आघाडीचे हिंतेंद्र ठाकूर यांचा ३६८७५ मतांनी पराभव करत विजय हासील केला. तर पालघरमध्ये शिवसेना शिंदे गटाचे गावित धेड्या यांनी शिवसेना ठाकरे गटाचे जयेंद्र दुबला यांचा पराभव केला. गावित धेड्या यांना ११२८९४ तर जयेंद्र दुबला यांना ७२५५७ इतकी मते पडली.

हे ही वाचा : 

ठाकरे चक्क म्हणाले, राज्यातील जनतेने खचून जाऊ नये!

जनतेनेच केले चंगू-मंगूंच्या मूळव्याधीचे ऑपरेशन

पंतप्रधान मोदींची निवडणुकीवर पहिली प्रतिक्रिया म्हणाले, ‘महाराष्ट्राच्या विकासाचा विजय’

जनतेचा कौल मान्य; अमित ठाकरेंनी व्यक्त केल्या भावना

 

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
213,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा