28.5 C
Mumbai
Tuesday, July 14, 2026
घरविशेषएआयनंतर आता भारतात 'क्वांटम' क्रांती !

एआयनंतर आता भारतात ‘क्वांटम’ क्रांती !

काय आहे केंद्र सरकारचे 'क्वांटम मिशन'?

Google News Follow

Related

एकेकाळी विज्ञानातील सर्वात रहस्यमय संकल्पनांपैकी एक असलेले क्वांटम मेकॅनिक्स, आता लेझर्स आणि मायक्रोचिप्सपासून ते सुरक्षित दळणवळण आणि क्वांटम कंप्युटिंगपर्यंतच्या तंत्रज्ञानाचा पाया बनले आहे. एआयनंतर आता जगभरात क्वांटम टेक्नॉलॉजीची शर्यत सुरू झाली आहे. केंद्र सरकारच्या ६ हजार कोटींच्या नॅशनल क्वांटम मिशनअंतर्गत पुढील ८ वर्षांत २० ते १,००० क्युबिट क्षमतेचे क्वांटम संगणक विकसित करणे, २ हजार किलोमीटरपर्यंत सुरक्षित क्वांटम संवाद प्रणाली उभारणे (जी हॅक करणे अशक्य असेल), अतिसंवेदनशील सेन्सर्स आणि नवीन क्वांटम पदार्थ विकसित करण्यात येणार आहेत.

ही अशी अत्याधुनिक संगणक प्रणाली आहे, जी आजच्या संगणकांपेक्षा अनेक पटींनी वेगाने आणि अधिक गुंतागुंतीची कामे करू शकते. अगदी सोप्या भाषेत सांगायचे झाले, तर समजा १० लाख कुलपे आहेत आणि त्यापैकी एकाची चावी शोधायची आहे. साधा संगणक एकेक चावी लावून पाहतो. मात्र, क्वांटम संगणक अनेक चाव्या एकाच वेळी तपासण्याची क्षमता ठेवतो. त्यामुळे जे काम आज तास किंवा दिवस लागून होते, ते भविष्यात काही मिनिटांत किंवा सेकंदांत होऊ शकते.

अवघड कामे क्वाटंम टेक्नॉलॉजीमुळे सहज शक्य होणार

क्वांटम टेक्नॉलॉजीमुळे आज अशक्य वाटणारी अनेक कामे काही क्षणात शक्य होऊ शकतात. बँकिंग यंत्रणा सुरक्षित करणे, कर्करोगासारख्या आजारांवर नवीन औषधे शोधणे, लष्करी संदेश हॅक करणे जवळपास अशक्य करणारी सुरक्षा व्यवस्था तयार करणे, चक्रीवादळ किंवा मुसळधार पावसाचा अधिक अचूक अंदाज वर्तवणे, अशी अत्यंत अवघड कामे क्वाटंम टेक्नॉलॉजीमुळे आता सहज शक्य होणार आहेत. केंद्र सरकारच्या ६ हजार कोटींच्या नॅशनल क्वांटम मिशनअंतर्गत पुढील ८ वर्षांत दोन हजार किलोमीटरपर्यंत सुरक्षित क्वांटम प्रणाली उभारली जाणार आहे.

क्वांटम सेन्सिंग अँड मेट्रोलॉजी हबची जबाबदारी आयआयटी बॉम्बेकडे

या प्रकल्पाची प्रमुख जबाबदारी महाराष्ट्रातील प्रतिष्ठित संस्थांवर सोपवली आहे. नॅशनल क्वांटम मिशन मोहिमेत ४३ संस्था, १७ राज्ये आणि २ केंद्रशासित प्रदेशांतील १५२ संशोधक एकत्र काम करत आहेत. महाराष्ट्रासाठी या मिशनचे महत्त्व अधिक आहे. देशभरात स्थापन करण्यात आलेल्या चार प्रमुख थिमॅटिक हबपैकी क्वांटम सेन्सिंग अँड मेट्रोलॉजी हबची जबाबदारी आयआयटी बॉम्बेकडे सोपविण्यात आली आहे. तर, ‘आयआयएसईआर’ पुणे आणि टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च (टीआयएफआर), मुंबई या संस्थाही या महत्त्वाकांक्षी मोहिमेतील प्रमुख आहेत.

हे ही वाचा:

पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीशी संबंधित संशयितांवर छापे; १०० हून अधिक जण ताब्यात

ऑस्ट्रेलियन माध्यमांवर ‘मिस्टर इंडिया’ पंतप्रधान मोदींची छाप

देशभरात मान्सूनचा कहर; १० जणांचा मृत्यू

निदा खानला जामीन देताना श्रीकृष्णाचा उल्लेख, पण गुन्हा गंभीरच

अमेरिका, चीन आणि युरोपीय देशांमध्ये क्वांटम तंत्रज्ञानावर अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक सुरू असताना भारतानेही या स्पर्धेत वेग घेतला आहे. केंद्र सरकारच्या आराखड्यानुसार पुढील ८ वर्षांत बहुनोडी क्वांटम नेटवर्क तयार करणे तसेच अणुघड्याळे, अतिसंवेदनशील सेन्सर्स आणि नवीन क्वांटम पदार्थ विकसित करणे ही प्रमुख उद्दिष्टे आहेत.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
320,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा