पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दुर्गापूरमधील खासगी वैद्यकीय महाविद्यालयात झालेल्या सामूहिक बलात्काराच्या प्रकरणावर अखेर मौन सोडले आहे. रविवारी त्या म्हणाल्या की, “रात्रीच्या वेळी मुलींनी बाहेर जाऊ नये”, आणि ही घटना “धक्कादायक” असल्याचे त्यांनी म्हटले. मात्र त्यांनी यासाठी आपल्या सरकारला दोष देणे योग्य नसल्याचे सांगत या महाविद्यालयाच्या प्रशासनावर जबाबदारी टाकली.
ममता बॅनर्जी म्हणाल्या, “विशेषतः रात्रीच्या वेळी एखाद्या मुलीला बाहेर येऊ देऊ नये. त्यांनाही स्वतःचे रक्षण करायला शिकावे लागेल.” त्या पुढे म्हणाल्या की ही घटना अत्यंत “धक्कादायक” आहे आणि “कोणालाही वाचवले जाणार नाही” असे आश्वासन दिले.
हे ही वाचा:
पंजाबमध्ये कोणत्या औषधांवर घातली बंदी ?
‘संडे ऑन सायकल’ मधून मांडवियांनी काय दिला संदेश ?
पंतप्रधान मोदी यांचा शेतकऱ्यांशी खास संवाद
‘सर तन से जुदा’चे नारे देणाऱ्या सात जणांच्या मुसक्या आवळल्या
“सरकारला का लक्ष्य केले जात आहे?”
बॅनर्जी यांनी विचारले की, त्यांच्या सरकारलाच का दोष दिला जात आहे? त्या म्हणाल्या, “ही घटना एका खासगी वैद्यकीय महाविद्यालयात घडली आहे. त्यामुळे त्याठिकाणच्या प्रशासनाने सुरक्षा सुनिश्चित करणे अपेक्षित होते. तरीसुद्धा सगळे आरोप आमच्यावर का केले जात आहेत?” त्यांनी यावेळी ओडिशातील पुरी बीचवर महिनाभरापूर्वी घडलेल्या एका सामूहिक बलात्काराच्या प्रकरणाचा संदर्भ देत प्रश्न उपस्थित केला, “ओडिशा सरकारने त्या प्रकरणात कोणती कारवाई केली आहे?”
प्रकरणाचा तपशील
शुक्रवारी संध्याकाळी, दुर्गापूरमधील एका खासगी वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसच्या दुसऱ्या वर्षात शिकणाऱ्या २३ वर्षीय विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. ही घटना रुग्णालयाच्या मागील बाजूस असलेल्या एकांत ठिकाणी घडल्याचे समजते. दुर्गापूर हे कोलकात्यापासून सुमारे १७० किलोमीटर अंतरावर आहे.
पीडितेच्या वडिलांची प्रतिक्रिया
पीडितेचे वडील, जे ओडिशाचे रहिवासी आहेत, यांनी सांगितले की, ते आपल्या मुलीला परत ओडिशामध्ये घेऊन जाणार आहेत. त्यांनी सांगितले, आता आम्हाला वाटते की येथे आमची मुलगी सुरक्षित नाही. कधीही तिचा जीव घेऊ शकतात. त्यामुळे आम्ही तिला ओडिशाला परत नेत आहोत. आता विश्वास उरला नाही. आम्हाला ती बंगालमध्ये ठेवायची नाही. ती आपले शिक्षण ओडिशातच पूर्ण करेल.
“ती वेदनेत आहे, चालू शकत नाही”
पीडित मुलीच्या वडिलांनी पुढे सांगितले, “माझी मुलगी प्रचंड वेदनेत आहे. ती सध्या चालूही शकत नाही. ती पूर्णपणे अंथरुणावर आहे. ते एएनआय (ANI) या वृत्तसंस्थेला सांगितले.







