28 C
Mumbai
Monday, July 20, 2026
घरराजकारणगिरीश महाजन यांचे आक्षेपार्ह फोटो व्हायरल प्रकरणी एकाला अटक

गिरीश महाजन यांचे आक्षेपार्ह फोटो व्हायरल प्रकरणी एकाला अटक

जळगाव सायबर पोलिसांची कारवाई

Google News Follow

Related

राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांचे आक्षेपार्ह फोटो तयार करून ते सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी जळगाव सायबर पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भरत मसके (वय ३४) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीने गिरीश महाजन यांची प्रतिमा मलिन करण्याच्या उद्देशाने आक्षेपार्ह स्वरूपाचे फोटो तयार करून ते विविध सोशल मीडिया माध्यमांवर प्रसारित केल्याचा आरोप आहे. या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर जळगाव सायबर पोलिसांनी तांत्रिक तपास सुरू करत आरोपीचा शोध घेतला आणि त्याला अटक केली.

या प्रकरणी गिरीश महाजन यांची बदनामी केल्याप्रकरणी संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राथमिक चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहितीही पोलिसांनी दिली आहे. सध्या पोलिस आरोपीच्या सोशल मीडिया व्यवहारांची तसेच या कृत्यामागे अन्य कोणाचा सहभाग आहे का, याची सखोल चौकशी करत आहेत.
हे ही वाचा:
रोहित-कोहलींचा ऐतिहासिक विक्रम!

शिवसेनेच्या मारकुट्या नगरसेवकाचे पोलिसांसमोर आत्मसमर्पण

फ्रान्सला नमवत इंग्लंडने पटकावले कांस्यपदक

मेसीला मागे टाकत एम्बाप्पेची सुवर्णकामगिरी!

सायबर पोलिसांनी नागरिकांना सोशल मीडियावर कोणतीही माहिती किंवा छायाचित्रे शेअर करण्यापूर्वी त्याची सत्यता पडताळून पाहण्याचे आवाहन केले असून, बनावट किंवा बदनामीकारक सामग्री प्रसारित करणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही दिला आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
321,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा