28.3 C
Mumbai
Monday, July 20, 2026
घरक्राईमनामाशिवसेनेच्या मारकुट्या नगरसेवकाचे पोलिसांसमोर आत्मसमर्पण

शिवसेनेच्या मारकुट्या नगरसेवकाचे पोलिसांसमोर आत्मसमर्पण

रमेश म्हात्रेला १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी

Google News Follow

Related

डोंबिवलीतील केडीएमसीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर झालेल्या मारहाणीच्या प्रकरणात शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांना न्यायालयाने १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या प्रकरणामुळे राज्यभरात संतापाची लाट उसळली असून वैद्यकीय क्षेत्रातूनही कठोर कारवाईची मागणी करण्यात आली होती.

या प्रकरणात स्थानिक न्यायालयाने सुरुवातीला रमेश म्हात्रे यांच्यासह काही आरोपींना जामीन मंजूर केला होता. मात्र डॉक्टरांवरील हल्ल्याचे गांभीर्य लक्षात घेऊन मुंबई उच्च न्यायालयाने स्वतःहून दखल घेत जामिनाला स्थगिती दिली आणि म्हात्रे यांना पोलिसांसमोर शरण जाण्याचे आदेश दिले. न्यायालयाने या प्रकाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांवरील हल्ले कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाहीत, असा स्पष्ट संदेश दिला.
हे ही वाचा:
फ्रान्सला नमवत इंग्लंडने पटकावले कांस्यपदक

आता सरकार बदलण्याचा लढा सुरू करा!

नागालँडमध्ये मुसळधार पावसाचा कहर

मेसीला मागे टाकत एम्बाप्पेची सुवर्णकामगिरी!

उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर रमेश म्हात्रे यांनी अखेर विष्णूनगर पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केले. त्यानंतर त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले. सुनावणीदरम्यान न्यायालयाने त्यांना १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. या प्रकरणातील इतर आरोपींनाही न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश कायम ठेवण्यात आले आहेत.

डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात एका रुग्णाच्या उपचारावरून झालेल्या वादानंतर डॉक्टर, परिचारिका आणि इतर कर्मचाऱ्यांवर हल्ला झाल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर राज्यभरातील डॉक्टर संघटनांनी निषेध व्यक्त करत आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी अधिक कडक कायदेशीर उपाययोजना करण्याची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयाने घेतलेली कठोर भूमिका महत्त्वाची मानली जात असून, कायद्यापुढे सर्व समान असल्याचा स्पष्ट संदेश या निर्णयातून दिला गेला आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
321,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा