28 C
Mumbai
Monday, July 20, 2026
घरविशेषनागालँडमध्ये मुसळधार पावसाचा कहर

नागालँडमध्ये मुसळधार पावसाचा कहर

पूर आणि भूस्खलनात तिघांचा मृत्यू, बचावकार्य युद्धपातळीवर

Google News Follow

Related

नागालँडमधील मोन जिल्ह्यात मुसळधार पावसाने भीषण कहर माजवला असून अचानक आलेल्या पुरामुळे आणि भूस्खलनामुळे किमान तीन जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक घरे मातीच्या ढिगाऱ्याखाली दबली असून काही नागरिक अद्याप बेपत्ता असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता प्रशासनाने वर्तवली आहे.

रविवारी पहाटेपासून सुरू असलेल्या अविरत पावसामुळे मोन शहरातील सखल भाग पाण्याखाली गेले. डोंगरउतारांवर मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाल्याने प्रमुख रस्ते बंद पडले असून वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. अनेक घरांचे नुकसान झाले असून सार्वजनिक पायाभूत सुविधांनाही मोठा फटका बसला आहे.
हे ही वाचा:
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना

फेसबुकवर ‘रशियन’ तरुणीची मैत्री पडली महागात

कुणाल कामरा व प्रकाश राज यांच्यावर गुन्हा दाखल करा !

अभिषेक बॅनर्जी यांच्या कार्यालयावरील पाडकामाला स्थगिती

नागालँड राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (NSDMA) दिलेल्या माहितीनुसार, बचाव पथके, पोलीस आणि स्थानिक प्रशासन घटनास्थळी युद्धपातळीवर मदतकार्य करत आहेत. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांचा शोध सुरू असून प्रभावित कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलविण्यात येत आहे. मात्र सतत सुरू असलेल्या पावसामुळे आणि बंद पडलेल्या रस्त्यांमुळे बचावकार्यात अडथळे निर्माण होत आहेत.

हवामान विभागाने ईशान्य भारतात पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिला असून नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, तसेच डोंगराळ आणि भूस्खलनप्रवण भागांपासून दूर राहावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. दरम्यान, नागालँडसह ईशान्य भारतातील अनेक भागांमध्ये अतिवृष्टीमुळे पूर आणि भूस्खलनाच्या घटना वाढत असून प्रशासन सतर्कतेच्या स्थितीत आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
321,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा