32 C
Mumbai
Monday, June 21, 2021
घर राजकारण ठाकरे सरकारच्या बेफिकीरीमुळेच मराठा आरक्षण गेलं

ठाकरे सरकारच्या बेफिकीरीमुळेच मराठा आरक्षण गेलं

Related

भाजपाचे खासदार नारायण राणे यांनी आज मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. ठाकरे सरकारच्या बेफिकीरीमुळेच मराठा आरक्षण गेल्याचं सांगतानाच मराठा समाजाला रोजगार द्या, शिक्षणात सवलत द्या आणि तीन हजार कोटींचं पॅकेज द्या, अशी मागणी नारायण राणे यांनी आज केली.

भाजपाच्या प्रत्येक मराठा नेत्याने एका एका जिल्ह्यात जाऊन मराठा आरक्षणविषयक पक्षाची भूमिका समजावून सांगण्यास सुरुवात केली आहे. आज नारायण राणे यांनी ठाण्यात पत्रकार परिषद घेऊन मराठा आरक्षणावरून ठाकरे सरकारवर टीकास्त्र सोडलं. मराठा समाजाला पुन्हा आरक्षण मिळेपर्यंत देवेंद्र फडणवीस सरकारने दिल्या होत्या तशा शिक्षण व रोजगारासाठीच्या सवलती द्याव्यात व त्यासाठी तीन हजार कोटींचे पॅकेज द्यावे. सर्वोच्च न्यायालयात आरक्षण रद्द होण्याआधी मराठा समाजातील ज्या उमेदवारांची भरती प्रक्रिया पूर्ण झाली होती त्यांना सरकारी नोकरीत तातडीने सामावून घ्यावे, अशी मागणी राणेंनी केली.

महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर मराठा आरक्षणाबाबत अनेक चुका करण्यात आल्या. सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाची बाजू मांडण्यात महाविकास आघाडी सरकार पूर्ण अपयशी ठरले आहे. सर्वोच्च न्यायालयात ज्या मुद्द्यांवर मराठा आरक्षण रद्द झाले त्याच मुदद्यांवर भाजपा सरकारने उच्च न्यायालयात आरक्षण टिकवले होते. महाविकास आघाडी सरकारने बेफिकीरी दाखवल्याने सर्वोच्च न्यायालयात चांगल्या रितीने बाजू मांडली गेली नाही. आघाडीच्या वकिलांमध्ये समन्वय नव्हता, वकील वेळेत न्यायालयात हजर झाले नाहीत, सरकारने खटला चालविण्यात टाळाटाळ करून तारखा मागितल्या, गायकवाड आयोगाच्या अहवालाच्या परिशिष्टाचे इंग्रजीत भाषांतर करून दिले नाही व त्यामुळे आयोग एकतर्फी असल्याचा समज निर्माण झाला, अशा अनेक चुका महाविकास आघाडी सरकारने केल्या, असं त्यांनी सांगितलं.

सुप्रीम कोर्टात फेरविचार याचिका दाखल करण्याचा राज्य सरकारकडे पर्याय आहे. पण आजपर्यंत त्यांनी तसे केलेले नाही आणि मुदत संपत चालली आहे. मराठा समाजाचे असलेले आरक्षण गमावले तरीही आघाडी सरकारची बेफिकिरी कमी होत नाही. दुसरीकडे केंद्र सरकारने मात्र १०२ व्या घटनादुरुस्तीनंतर राज्यांचा अधिकार अबाधित आहे, हे स्पष्ट होण्यासाठी फेरविचार याचिका दाखल केली आहे. असं त्यांनी स्पष्ट केलं.

हे ही वाचा:

तंबाखू सेवनामुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये ६ टक्क्यांची घट

दुबईत 17 सप्टेंबरपासून आयपीएल सुरु?

पंजाबमध्ये काँग्रेस फुटीच्या उंबरठ्यावर?

फडणवीस-पवार सदिच्छा भेटीतून राजकीय चर्चांना उधाण

१०२ व्या घटना दुरुस्ती नंतरही मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारलाच पुढाकार घ्यावा लागेल. त्यासाठी सर्वप्रथम राज्य मागासवर्ग आयोगाकडून मराठा समाज मागास असल्याचा अहवाल नव्याने घ्यावा लागेल व त्यामध्ये गायकवाड आयोगाबद्दल कोर्टाने मांडलेल्या मुद्द्यांचे उत्तर असावे लागेल. त्यानंतर तो अहवाल केंद्रीय मागासवर्ग आयोगाकडे पाठवावा लागेल. त्यांच्या मंजुरीनंतर तो राष्ट्रपतींकडे जाईल व त्यांच्या मंजुरीनंतर राज्याला मराठा समाजासाठी आरक्षणाचा कायदा पुन्हा करता येईल. त्या दृष्टीने राज्य मागासवर्ग आयोगाचे गठन करण्यासह कोणतेही पाऊल आघाडी सरकार उचलत नाही. केवळ पंतप्रधान व राष्ट्रपतींना निवेदन देऊन मराठा समाजाची दिशाभूल करण्याचा आणि आपली जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न राज्य सरकार करत आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
526अनुयायीअनुकरण करा
1,110सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा