28 C
Mumbai
Monday, June 27, 2022
घरराजकारणसंजय राऊतांवर मेधा सोमय्यांचा १०० कोटींचा दावा

संजय राऊतांवर मेधा सोमय्यांचा १०० कोटींचा दावा

Related

भारतीय जनता पार्टीचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी आता उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. मुंबई उच्च न्यायालयात मेधा सोमय्यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याविरोधात १०० कोटी रुपयांचा मानहानीचा दावा दाखल केला आहे. त्यापूर्वी बुधवार, १८ मे रोजी मेधा यांनी राऊत यांच्याविरोधात महानगराच्या शिवडी न्यायालयात फौजदारी मानहानीचा खटला दाखल केला होता.

१०० कोटी रुपये शौचालय कथित घोटाळ्याप्रकरणी मेधा सोमय्यांनी काही दिवसांपूर्वी तक्रार दाखल केली होती. राऊत यांनी गेल्या महिन्यात केलेले आरोप निराधार आणि बदनामीकारक असल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे. मीरा-रोड येथील सार्वजनिक शौचालयाच्या बांधकामात १०० कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप संजय राऊतांनी त्यांच्यावर आणि त्यांचे पती किरीट सोमय्या यांच्यावर केल्याने मला धक्का बसल्याचे मेधा म्हणाल्या आहेत.

हे ही वाचा:

अफगाणिस्तानात महिला टीव्ही अँकरचे ‘चेहरे’ गायब

इंग्लंडमधील काँग्रेस कार्यकर्त्यांपुढे सोनिया गांधीनी पसरला पदर

जपानी मुलाचं हिंदी ऐकून पंतप्रधान मोदी म्हणाले…

मशिदींतून काढलेले भोंगे शाळा, रुग्णालयांना दान

पुढे त्या म्हणाल्या, प्रमुख वृत्तपत्रांनी राऊत यांचा हवाला देत ही बातमी प्रसिद्ध केली. राऊत यांनी प्रसारमाध्यमांमध्ये केलेले हे वक्तव्य बदनामीकारक असून त्यामुळे सर्वसामान्यांमध्ये माझे चारित्र्य आणि प्रतिमा डागाळली आहे. त्यामुळेच आम्ही न्यायालयात केलेल्या तक्रारीत राऊत यांच्याविरोधात नोटीस बजावण्याची मागणी केली आहे. मेधा यांनी राऊत यांच्याविरोधात न्यायालयात १०० कोटी रुपयांचा मानहानीचा खटला दाखल केला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,937चाहतेआवड दर्शवा
1,922अनुयायीअनुकरण करा
11,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा