27 C
Mumbai
Tuesday, September 27, 2022
घरराजकारणकाँग्रेसचे पदाधिकारी म्हणाले, बरे झाले मविआ सरकार पडले

काँग्रेसचे पदाधिकारी म्हणाले, बरे झाले मविआ सरकार पडले

हे विधान काँग्रेसचे नेते रमाकांत म्हात्रे यांनी केले असून याला इतर पदाधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे.

Related

एकनाथ शिंदे आणि आमदारांनी केलेल्या उठावानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळले. राज्यात शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाले परंतु, उठवामुळे महाविकास आघाडीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सत्ताधाऱ्यांवर टीका करायला सुरुवात केली.पण काँग्रेसच्या कार्यकारणीतील एका नेत्याने, महाविकास आघाडी सरकार पडले हे बरेच झाले.अडीच वर्षे सरकार फक्त पैसेच खात होते, असे विधान केले असून यामुळे खळबळ उडाली आहे.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीच्या विस्तारित कार्यकारिणीची बैठक मुंबईत आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह अखिल भारतीय काँग्रेस समितीचे चिटणीस आशिष दुआ, सोनल पटेल यांच्यासह ठाकरे सरकारमधील अनेक माजी मंत्री, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

हे ही वाचा:

धक्कादायक! कुरापती चीन अरुणाचलजवळ करतोय बांधकाम

नीरजने रचला इतिहास, डायमंड लीग जिंकणारा नीरज पहिला भारतीय

‘धर्मवीर’ भेटीला येतायत नव्या रुपात, प्रसाद ओकने केली पोस्ट

जगात भारी पंतप्रधान मोदी!

या बैठकीत नवी मुंबईचे माजी उपमहापौर रमाकांत म्हात्रे यांनी महविकास आघाडी सरकारबद्दल नाराजी बोलून दाखवली. ते म्हणाले, अडीच वर्षाच्या काळात मंत्र्यांनी फक्त पैसे खाण्याचे काम केले. पक्षाचे सगळे मंत्री अडीच वर्षे फक्त पैसे खात होते. कोणताही कार्यकर्ता भेटायला गेला, तर तासनतास बाहेर बसवून ठेवायचे. त्यामुळे हे सरकार पडल्याचा सर्वाधिक आनंद आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांना झाला असल्याचे म्हात्रे म्हणाले. विशेष म्हणजे रमाकांत म्हात्रे यांनी असा आरोप केल्यावर इतर अनेक पदाधिकाऱ्यांनी याला दुजोरा दिला आहे. केंद्रीय नेत्यांसमोर अशाप्रकारचे आरोप झाल्याने पक्षातील अंतर्गत गटबाजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,966चाहतेआवड दर्शवा
1,942अनुयायीअनुकरण करा
40,300सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा