34 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
घरक्राईमनामामहाराष्ट्राला काळिमा फासणारी घटना - राज ठाकरे

महाराष्ट्राला काळिमा फासणारी घटना – राज ठाकरे

Google News Follow

Related

महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख ह्यांच्यावर खंडणी रॅकेट चालवण्याचे आरोप झाल्यनंतर ठाकरे सरकारवर चहू बाजूंनी टीकेची झोड उठली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी, ही महाराष्ट्राला काळिमा फासणारी घटना असल्याचे म्हणत सरकारवर निशाणा साधला आहे . राज ठाकरे यांनी ट्विटरच्या माध्यमातून ठाकरे सरकारला लक्ष्य केले आहे.

महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे ह्याला दर महिन्याला १०० कोटी रुपये पोहोचवण्यास सांगितल्याचा दावा केला गेला आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून हा खळबळजनक दावा केला आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे ह्याला वसुलीचे काम दिल्याचे या पत्रात म्हटले आहे. या पत्रानंतर ठाकरे सरकार पुन्हा एकदा विरोधकांच्या निशाण्यावर आले आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे.

हे ही वाचा:

गृहमंत्र्यांवर झालेल्या खंडणीच्या आरोपांनांतर मुख्यमंत्री क्वॉरेन्टाईन होण्याची शक्यता

पोलिस अधिकाऱ्याने राज्याच्या गृहमंत्र्यांवर खंडणीचे आरोप करणे ही अभूतपूर्व घटना – देवेंद्र फडणवीस

दर महा १०० कोटी पोहोचवण्याचे सचिन वाझेला गृहमंत्र्यांचे आदेश, परमबीर सिंह यांच्या आरोपांनी खळबळ

मुख्यमंत्र्यांनी आता १०० कोटींच्या वसुलीचा खुलासा करावा

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीदेखील देशमुखांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. राज ठाकरे यांनी यासंबंधीचे ट्विट केले आहे. “मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग ह्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं पत्र अत्यंत धक्कदायक आहे. महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळिमा फासणारी ही घटना आहे. गृहमंत्री अनिल देशमुख ह्यांनी तात्काळ राजीनामा द्यायलाच हवा आणि ह्या प्रकरणात त्यांची उच्चस्तरीय चौकशी देखील व्हायला हवी.” असे राज ठाकरे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
154,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा