28 C
Mumbai
Thursday, May 2, 2024
घरराजकारण'राज साहेब आपल्या परखड वक्तृत्वाची महाराष्ट्र वाट पाहतोय'

‘राज साहेब आपल्या परखड वक्तृत्वाची महाराष्ट्र वाट पाहतोय’

मनसे कार्यकर्त्यांनी लिहिले पत्र

Google News Follow

Related

शिवसेना आणि दसरा मेळावा असे गेल्या वर्षानुवर्षांचे समीकरण. एकनाथ शिंदे यांनी केलेली बंडाळी त्यानंतर झालेल्या सत्तांतरानंतर राज्यातील राजकीय चित्र पूर्णपणे बदलले आहे. ठाकरे यांच्या शिवसेनेची शकले पडल्यानंतर आता शिवाजी पार्कवर विचारांचं साेनं काेण लुटणार यावरून राजकीय चर्चा रंगली आहे. दसरा मेळावा काेणी घ्यायचा यावरून सध्या जाेरदार रस्सीखेच सुरू आहे.

शिवसेनेनं दसरा मेळावा घेण्यासाठी मुंबई महापालिकडे परवानगी मागितली आहे तर दुसऱ्या बाजुला शिंदे गटही दसरा मेळावा घेण्यासाठी आग्रही आहे. मेळावा घेण्यावरून सुरु असलेल्या वादाच्या पार्श्वभूवर राज ठाकरे यांनी वारसा हा वास्तूचा नसतो, तर विचारांचा असतो असा टाेला लगावला हाेताे पण आता याच विचारांचं साेनं राज ठाकरे यांनी वाटावं, असा आग्रह मनसे कार्यकर्त्यांनी धरला आहे. त्याबाबतचे एक पत्रही राज ठाकरे यांना दिल्याची चर्चा आहे.

गणपती दर्शनाच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांच्या घरी भेट दिली. त्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे आणि भाजपचे नेते विनाेद तावडे यांनी देखील ठाकरे यांच्या घरी भेट दिली हाेती. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा येत्या पाच सप्टेंबरला मुंबई भेटीवर येत आहे. या भेटीमध्ये राज ठाकरे आणि अमित शहा यांची भेट घडवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. राज ठाकरे यांनी अलिकडेच हिंदुत्वाचा मुद्दा उचलला असल्याने भाजप- मनसे जवळ येणार का अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

दसरा मेळाव्यावरून कुरघाेडी सुरू असतानाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेेनेही राज ठाकरे यांनी दसरा मेळावा घ्यावा,अशी मागणी केली आहे. या संदर्भात सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी ट्वीट केले आहे.

हे ही वाचा:

गर्भवतीचा मृत्यू झाला आणि पोर्तुगालच्या आरोग्यमंत्र्यांनी राजीनामा दिला

सचिननंतर मुंबईत विराटही सुरू करतोय रेस्टॉरन्ट

बॅनरला विरोध केला म्हणून मनसे कार्यकर्त्याची महिलेला धक्काबु्क्की

मोठा दिलासा, एलपीजी गॅसच्या दरात १०० रुपयांची कपात

या ट्विटमध्ये त्यांनी राज ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. “हिंदूंची मरगळलेली मनं पुन्हा एकदा चेतवण्याचे, मराठीजनांचा मानसिक गोंधळ दूर करण्याचे कार्य सिद्धीस नेण्याची क्षमता असलेली एकमेव व्यक्ती या महाराष्ट्रात आहे, ती म्हणजे आपण – हिंदूजननायक श्रीमान राजसाहेब ठाकरे! महाराष्ट्र सेवकांची आपल्याला हात जोडून कळकळीची विनंती आहे की, दसऱ्याला आपण वंदनीय हिंदुहृदसम्राट कै. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर कडवी निष्ठा असणाऱ्या प्रत्येक हिंदूला, प्रत्येक मराठी माणसाला मार्गदर्शन करावे,” अशी मागणी या पत्राद्वारे करण्यात आली आहे.

दसऱ्यानिमित्त शिवतिर्थावर आपल्या परखड, राेखठाेक ‘ठाकरी’ शैलीतील वक्तृत्वाच्या तेज:पुंज अविष्काराची ‘जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांना, भगिनिंनाे आणि मातांनाे, या हाकेची महाराष्ट्र आणि अवघा हिंदुस्थान वाट पहात आहेत असे या पत्रात लिहिलेलं आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
149,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा