28 C
Mumbai
Saturday, October 1, 2022
घरराजकारणबॅनरला विरोध केला म्हणून मनसे कार्यकर्त्याची महिलेला धक्काबु्क्की

बॅनरला विरोध केला म्हणून मनसे कार्यकर्त्याची महिलेला धक्काबु्क्की

Related

आपल्या दुकानासमाेर बॅनर लावण्यासाठी विराेध करणाऱ्या महिलेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण करण्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. ही घटना मुंबादेवी भागात घडली आहे. सदर महिलेला धक्काबुक्की व मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे खळबळ उडाली आहे.

धक्काबुकी करण्यात आलेल्या महिलेचं मुंबादेवी भागात मेडिकलचं दुकान आहे. या दुकानासमाेर गणपतीचं बॅनर लावण्यासाठी मनसे पदाधिकारी विनाेद अरगिळे व त्यांचे साथीदार खांब राेवत हाेते. यातील एक खांब या महिलेच्या दुकानासमाेर जमिनीत राेवण्यात येत हाेता. त्याला या महिलेनं आक्षेप घेत आपल्या दुकानासमाेरील बॅनर व खांब काढून टाकण्यास सांगितले. त्यावरून वाद झाला. या वादातून मनसे पदाधिकाऱ्यांनी वयस्कर महिलेच्या कानशिलात लगावली. इतकेच नाही तर तिला शिविगाळ करत धक्काबुक्की ही करण्यात आली. पीडित महिलेचे नाव प्रकाश देवी असून ती धक्काबुक्कीमध्ये दाेनवेळा जमिनीवर पडली. त्याचवेळी एका मुलीने येऊन त्यांना उठवले. हा सर्व प्रकार व्हिडीओ मध्ये कॅमेऱ्यात कैद झाला आहे. आता हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

हे ही वाचा:

मोठा दिलासा, एलपीजी गॅसच्या दरात १०० रुपयांची कपात

इस्रायल सीरियामध्ये युद्धाचे ढग

देश बदलणारं ‘फिझंट आयलंड’

सर्वोत्कृष्ट मंडळाला मिळणार पाच लाख

या धक्काबुक्कीच्या प्रकारानंतर मुंबादेवी भागात खळबळ माजली. स्थानिक लाेकांकडून या घटनेचा निषेध करत संताप व्यक्त करण्यात येत आहे. धक्काबुक्की न करता सामाेपचाराने हा वाद मिटवता आला असता असे स्थानिकांचे म्हणणे आहे. मनसेच्या या कृतीबद्दल नागरिकांनीही आक्षेप घेतला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,969चाहतेआवड दर्शवा
1,946अनुयायीअनुकरण करा
41,500सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा